Join us  

IPL 2023, KKR Vs SRH: ब्रुकच्या तुफानी सुरुवातीनंतर हैदराबादला २ धक्के, रसेलची एकाच षटकात डबल स्ट्राईक 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकातामधील ईडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध तुफानी सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकात रसेलने दोन धक्के देत हैदराबादला बॅकफूटवर धाडले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 8:02 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज कोलकातामधील ईडन गार्डनवर होत असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध तुफानी सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकात रसेलने दोन धक्के देत हैदराबादला बॅकफूटवर धाडले.  या सामन्यात सलामीवीर हॅरी ब्रुकने कोलकात्याच्या गोलंदाजांवर तुटून पडत घणाघाती फटकेबाजी केली. ब्रुकच्या या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने अवघ्या २६ चेंडूत ५० धावांपर्यंत मजल मारली. मात्र पाचव्या षटकात पहिल्याच चेंडूवर मयांक अग्रवाल आणि शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला माघारीत घाडत रसेलने हैदराबादच्या डावावर लगाम कसला आहे. 

कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर हॅरी ब्रुकने हैदराबादला जोरदार सुरुवात करून दिली. ब्रुकने उमेश यादवने टाकलेल्या पहिल्या षटकात १४ धावा काढल्या. त्यानंतर फर्ग्युसनले टाकलेल्या दुसऱ्या षटकात ब्रुक आणि मयांक अग्रवाल यांनी १४ धावा वसूल केल्या.  तर उमेश यादवने टाकलेल्या तिसऱ्या षटकात ब्रुकने आणखी १५ धावा वसूल केल्या. मात्र सुनील नारायणने चौथ्या षटकात केवळ ३ धावा देत हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लावला. तर पाचव्या षटकाच्या सुरुवातीवाच रसेलने मयांक अग्रवालला बाद केले. मात्र याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत राहुल त्रिपाठीने हैदराबादचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र याच षटकातील शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठी ९ धावा काढून बाद झाला. पॉवर प्लेमधील षटकांच्या अखेरीस हैदराबादच्या २ बाद ६६ धावा झाल्या होत्या. 

दरम्यान, आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत असलेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कोलकाता नाईटरायडर्सने संघात कुठलाही बदल केलेला नाही. तर सनरायझर्स हैदराबादने संघामध्ये एक बदल करताना वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अभिषेक शर्मा याला संघात स्थान दिले आहे.

कोलकाता नाईटरायडर्सचा संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मागच्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय मिळवला होता. त्या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. तर सनरायझर्स हैदरााबादने पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून आपली पराभवांची मालिका खंडित केली होती. 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App