Join us  

IPL 2023, GT vs RR Live : ७ वर्षांनंतर प्रथमच 'भोपळ्या'वर बाद झाला; मोहम्मद शमीने RRच्या फलंदाजाचा 'दांडा' उडवला, Video 

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झालेली नाही. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर हे फॉर्मात असलेले सलामीवीर ४ धावांवर बाद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:09 PM

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सची सुरुवात काही खास झालेली नाही. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर हे फॉर्मात असलेले सलामीवीर ४ धावांवर बाद झाले. 

ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात वृद्धीमान साहाला बाद केले. साई सुदर्शन ( २०) रन आऊट झाला. शुबमन गिलला ( ४५) कर्णधार हार्दिक पांड्याने ( २८) साथ दिली. राजस्थानच्या गोलंदाजांनी GTच्या धावगतीवर चांगले वेसण घातले होते. अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले. १३ चेंडूंत २७ धावा करणाऱ्या मनोहरला झम्पाने बाद केले. मिलर ३० चेंडूंत ४६ धावांवर सीमारेषेवर झेलबाद झाला. GT ने ७ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली. संदीप शर्माने दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या RRची सुरूवात काही चांगली झाली नाही. हार्दिकने दुसऱ्या षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वालची ( १) विकेट घेतली. त्यानंतर पुढील षटकात मोहम्मद शमीने अप्रतिम चेंडूवर जॉस बटलरचा ( ०) त्रिफळा उडवला. ७ वर्षांनंतर आयपीएलमध्ये जॉस बटलर शून्यावर बाद झाला. ट्वेंटी-२०मध्ये ८६ इनिंग्जनंतर बटलर भोपळ्यावर बाद झाला आहे.    

टॅग्स :आयपीएल २०२३जोस बटलरमोहम्मद शामीराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स
Open in App