IPL 2023 Final GT vs CSK Live : १२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य

दोनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आणि ११.४५ नंतर सामना सुरू झाल्यास षटकं कमी केले जातील, हे स्पष्ट करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:45 PM2023-05-29T23:45:25+5:302023-05-29T23:46:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Match will restart at 12.10 am, 15 over game in the chase; CSK need 170 in 15 overs. | IPL 2023 Final GT vs CSK Live : १२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य

IPL 2023 Final GT vs CSK Live : १२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी केलेल्या आतषबाजीनंतर वरुण राजाने फटकेबाजी सुरू केली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि आता समीकरणाची मारामारी सुरू झाली आहे. दोनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आणि ११.४५ नंतर सामना सुरू झाल्यास षटकं कमी केले जातील, हे स्पष्ट करण्यात आले होते. १२. १० वाजता मॅच सुरू होणार आहे. 

गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावांनी मॅच फिरवली. वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. शुबमन व साहा यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्यानंतर साई सुदर्शनने अविश्वसनीय खेळी केली. साहा आणि सुदर्शन यांनी ४२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. साईने हार्दिक पांड्यासह ३३ चेंडूंत ८१ धावा झोडल्या. हार्दिक १२ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. 


तुषार देशपांडे पुन्हा एकदा महागडा ठरला. त्याच्या चार षटकांत ५६ धावा आल्या. मथिशा पथिरानाने २ विकेट्स घेतल्या, परंतु त्यानेही ४४ धावा दिल्या. दीपक चहर ( १-३८), रवींद्र जडेजा ( १-३८) आणि महिश तीक्षणा ( ०-३६) यांनाही मार बसला. इनिंग्ज ब्रेकमध्ये अर्धा तास मनोरंजनाचा सोहळा झाला अन् त्यानंतर पावसाने बॅटिंग सुरू केली. ऋतुराज गायकवाडने ३ चेंडूंत ४ धावा करून चांगली सुरुवात करून दिली होती. पण, पावसाच्या हजेरीने CSK चं विजयाचं समीकरण आणखी बिघडवले आहे.

१०.४५ वाजता मॅच रेफरी आणि अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली. यावेळी GT कर्णधार हार्दिक त्यांच्याशी संवाद साधताना दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा ११.३० वाजता खेळपट्टीची पाहणी केली गेली. १२.१० वाजता सामना पुन्हा सुरू होणार असून १५ षटकांची मॅच होणार असल्याचे जाहीर केले गेले.  CSK ला 171 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि त्याही 15 षटकांत. प्रत्येक गोलंदाजाला केवळ ३ षटकं आणि ४ षटकांचा पॉवर प्ले

 

Web Title: IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Match will restart at 12.10 am, 15 over game in the chase; CSK need 170 in 15 overs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.