IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live :  दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच पराभवानंतर अखेर आज सूर गवसलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 10:26 PM2023-04-20T22:26:34+5:302023-04-20T22:31:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, DC vs KKR Live : Ishant Sharma 2/19 in 4 overs,  Kolkata Knight Riders 127/9 | IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live :  दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच पराभवानंतर अखेर आज सूर गवसलेला पाहायला मिळाला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या आजच्या सामन्यात DC ने घरच्या मैदानावर चांगला खेळ केला. २ वर्षांनंतर आयपीएल खेळणाऱ्या इशांत शर्मा ( Ishant Sharma), अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन धक्के दिले. एनरिच नॉर्खियानेही दोन बळी टीपले. पदार्पणवीर जेसन रॉयने ( jason roy) संयमी खेळ करून KKR ला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी जवळपास ६७ चेंडू निर्धाव टाकली. 

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना पावसामुळे १ तास उशीराने सुरू झाला. नवी दिल्लीत पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती आणि वारंवार इन्स्पेशन करूनही सामन्याची वेळ ठरत नव्हती. अखेर पावसाने विश्रांती घेतली अन् अम्पायर्सनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर सामना ८.३० वाजता खेळवण्याचा निर्णय झाला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आज दिल्लीकडून पदार्पण करतोय. KKR कडून लिटन दास व जेसन रॉय यांनी पदार्पण केलं. मुकेश कुमारने १५ धावांवर KKRला पहिला धक्का दिला, लिटन दास ४ धावांवर झेलबाद झाला. 


मागील सामन्यातील शतकवीर वेंकटेश अय्यर ( ०) आज एनरिच नॉर्खियाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार नितिश राणा ( ४) इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि ही इशांतची १००वी विकेट ठरली. ७१७ दिवसानंतर इशांतने आयपीएलमध्ये विकेट घेतली. अक्षर पटेलने त्याच्या दोन षटकांत KKRला दोन धक्के दिले. मनदीप सिंग ( १२) याचा त्रिफळा उडवल्यानंतर रिंकू सिंगला ( ६) झेल देण्यास भाग पाडले. KKR चे ६ फलंदाज ६८ धावांत तंबूत परतले. पुढील षटकात इशांतने KKRला सातवा धक्का देताना सुनील नरीनला ( ४) माघारी पाठवले. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इशानने ४-०-१९-२ अशी स्पेल टाकली. 


हिटर आंद्रे रसेल याला रोखण्यासाठी कुलदीप यादवला गोलंदाजीला आणले, परंतु त्याने सेट फलंदाज जेसन रॉयला ( ४३) माघारी पाठवले. जेसन उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात अमन खानच्या हाती झेल देऊन बसला. अनुकुल रॉय पुढच्या चेंडूवर पायचीत झाला, कुलदीपची हॅटट्रिक मात्र हुकली. नॉर्खियाने KKRचा नववा फलंदाज बाद केला. रसेलने खेचलेला खणखणीत फटका नॉर्खियाच्या पायावर जोरदार आदळला अन् तो दुखपातग्रस्त झाला. रसेलने अखेरच्या षटकात ३ षटकार खेचून KKRला १० बाद १२७ धावा करून दिल्या. त्याने नाबाद ३८ धावा केल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, DC vs KKR Live : Ishant Sharma 2/19 in 4 overs,  Kolkata Knight Riders 127/9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.