Join us  

IPL 2023, CSK vs LSG : चेपॉकवर येताच इमोशनल झाला Suresh Raina, ऋतुराजला मारली कडकडून मिठी अन् म्हणाला... 

IPL 2023, CSK vs LSG : १४२६ दिवसानंतर महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 7:39 PM

Open in App

IPL 2023, CSK vs LSG : १४२६ दिवसानंतर महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळणार आहेत. २०१८नंतर आयपीएलमध्ये प्रथमच होम-अवे सामने होत आहेत आणि चेन्नईचा हा चिदंबरम स्टेडियमवरील यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे स्टेडियम खचाखच भरलेले पाहायला मिळतेय.. येथील वातावरण एकंदर धोनीमय झालेले पाहायला मिळतेय. पण, चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात एका स्टार खेळाडूची उणीव आज प्रकर्षाने जाणवतेय आणि तो म्हणजे सुरेश रैना ( Suresh Raina)... Mr. IPL म्हणून ओळखला जाणाऱ्या रैनाशिवाय प्रथमच CSK चेपॉकवर खेळतोय आणि त्यामुळे रैनाही भावूक झालेला पाहयला मिळतोय... 

समालोचकाच्या भूमिकेत असलेला रैना चेपॉकवर येताच भावूक झाला आणि त्याने ऋतुराज गायकवाडला कडकडून मिठी मारली. सुरेश रैनाने चेपॉकवर सर्वाधिक १४९८ धावा केल्या आहेत आणि यंदा प्रथमच त्याच्याशिवाय CSK येथे खेळणार आहे.  ३ वर्ष, १० महिने, ३ आठवडे आणि ४ दिवसांनी धोनीला चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे. रैनाने २०५ आयपीएल सामन्यांत ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे आणि ५०६ चौकार व २०३ षटकार त्याने खेचले आहेत. 

चेपॉकवर येताच रैनाने ट्विट केले की, पुन्हा एकदा घरी आल्यासारखं वाटतंय... या मैदानाने माझ्या कारकीर्दितील बरेच चढ-उतार पाहिले. येथे पुन्हा येऊन आनंद वाटतोय.. हा खूप भावनिक क्षण आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App