Join us  

MS Dhoni चा साधेपणा! स्वत: रंगवल्या CSKच्या चेन्नईतील स्टेडियममधील खुर्च्या, Video Viral

धोनी यशस्वी कर्णधार आहे, त्यासोबतच उत्तम माणूस असल्याचे त्याचे सहकारी नेहमी सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 1:39 PM

Open in App

MS Dhoni painting Chairs: IPL 2023चा पहिला सामना 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. IPL 2022  चा हंगाम CSK साठी खूप वाईट होते. कारण हा संघ 9व्या स्थानावर होता. महेंद्रसिंग धोनीचा चेन्नईसोबतचा हा शेवटचा हंगाम असू शकतो त्यामुळे धोनीला संस्मरणीय, नेत्रदीपक निरोप देण्याचा त्याच्या संघाचा प्रयत्न असेल. या दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये धोनी हातात स्प्रे पेंट घेऊन त्याने खुर्च्या पिवळ्या रंगात रंगवत आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये धोनी खुर्च्यांवर पिवळा रंग मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना ३ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्ससोबत होणार आहे. महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार मानला जातो. चेन्नई सुपर किंग्ज साठीदेखील त्याने ४ विजेतेपदं मिळवली आहेत. असे असताना धोनीने आपल्यातील साधेपणा टिकवून ठेवला आहे आणि स्वत: स्टेडियममधील खुर्च्यांना पिवळा रंग मारताना दिसत आहे. त्यामुळेच त्याच्या या कृतीचे कौतुक होताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या IPL 2023 संघात अनेक बदल केले आहेत. ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा सारखे खेळाडू यावेळी एकत्र नसतील, तर संघात बेन स्टोक्स, कायल जेमिसन आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता. मात्र, कायल जेमिसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला. त्याच्या जागी संघात सिसांडा मगालाचा समावेश करण्यात आला आहे.मुकेश चौधरीच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का बसला आहे. हा वेगवान गोलंदाजही संपूर्ण मोसम संघाबाहेर राहू शकतो.

CSK चा पूर्ण चमू-

  • कर्णधार आणि यष्टिरक्षक: एमएस धोनी
  • फलंदाज: रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद
  • गोलंदाज: दीपक चहर, तुषार देशपांडे, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना
  • अष्टपैलू: रवींद्र जडेजा, मोईन अली, मिचेल सँटनर, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश थिक्शाना, राजवर्धन हंगेरगेकर, बेन स्टोक्स, काइल जेमिसन, निशांत सिंधू, अजय मंडल, के. भगत वर्मा

 

 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सचित्रकला
Open in App