Join us  

IPL 2023 Auction : रवींद्र जडेजा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार? CSKनं स्पष्ट केली भूमिका, मेगा ऑक्शनची ठरली तारीख  

IPL 2023 Auction : कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगचे दोन पर्व यूएईत खेळवण्यात आली.. मागच्या वर्षी कोरोना सावट कमी झाल्याचं पाहून BCCI ने आयपीएल २०२२ चे आयोजन महाराष्ट्र, कोलकाता व अहमदाबाद या तीन राज्यांत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 4:20 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगचे दोन पर्व यूएईत खेळवण्यात आली.. मागच्या वर्षी कोरोना सावट कमी झाल्याचं पाहून BCCI ने आयपीएल २०२२ चे आयोजन महाराष्ट्र, कोलकाता व अहमदाबाद या तीन राज्यांत केले. आयपीएल २०२२चे साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात झाले. त्यानंतर बाद फेरीच्या लढती कोलकाता व अहमदाबाद येथे झाल्या. १० संघाचा समावेश असल्याने स्पर्धेचे फॉरमॅटही बदलले गेले होते. पण, आता कोरोनाचं संकट गेल्याचं चित्र आहे आणि प्रेक्षकही स्टेडियममध्ये परतले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये पुन्हा जुन्या फॉरमॅटमध्ये म्हणजेच होम/अवे स्वरूपात होणार आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतेच तसे संकेत दिले. पण, खरी गंमत आयपीएल २०२३ ऑक्शनमध्ये ( IPL 2023) पाहायला मिळणार आहे. बऱ्याच खेळाडूंची पुन्हा अदलाबदल पाहायला मिळेल.

आयपीएलमध्ये आता ‘IMPACT PLAYER’ संकल्पना, १२ वा खेळाडूही उतरणार मैदानावर; जाणून घ्या नियम

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले. आयपीएल २०२२मध्ये १० संघांची दोन गटांत विभागणी करून साखळी फेरीच्या लढती झाल्या होत्या. पण, आता १० संघ आपापल्या घरच्या मैदानावर सामने खेळतील. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) चाहते आनंदात आहेत, कारण महेंद्रसिंग धोनीला त्यांना चेपॉकवर खेळताना पाहायला मिळणार आहे. पण, त्याचवेळी रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) माजी विजेत्यांकडून खेळणार की नाही याची चिंता त्यांना लागली आहे. 

चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार? समोर आलं मोठं नाव, CSKची घोषणा

रवींद्र जडेजा आयपीएल २०२२मध्ये कर्णधारपदाच्या नाट्यानंतर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. CSK ने त्याला सर्वाधिक १६ कोटी रूपये देऊन आपल्याकडे कायम राखले होते, परंतु कर्णधारपद देऊन नंतर ते काढून घेतल्याने तो नाराज झाला. त्याने सोशल मीडियावरून CSK संदर्भातील पोस्ट डिलीट केल्या. आता आयपीएल २०२३साठी १६ डिसेंबरला ऑक्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Cricbuzz ने त्या आशयाचे वृत्त दिले आहे. त्यापूर्वी ट्रेड विंडोद्वारे सर्व फ्रँचायझींमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) जडेजाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी CSK कडे प्रस्ताव पाठवला, परंतु CSK अष्टपैलू खेळाडूला रिलीज करण्यात तयार नसल्याचे वृत्त आहे.  फ्रँचायझीच्या पर्समधील रक्कमही ५ कोटींनी वाढवून ९५ कोटी करण्यात आली असल्याचे क्रिकबजने म्हटले आहे. जडेजाव्यतिरिक्त राहुल तेवातिया व आर साई किशोर यांच्यासाठी गुजरात टायटन्सकडे विनंती आल्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२२रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सबीसीसीआय
Open in App