IPL 2023 : अजिंक्य रहाणेने १७२ सामन्यानंतर जिंकली ट्रॉफी; जाणून घ्या २०० सामने खेळूनही कोणाची पाटी कोरी 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने पटकावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:00 PM2023-05-31T16:00:06+5:302023-05-31T16:00:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : Ajinkya-rahane-win-ipl-trophy-after-172-matches, check the list of players most-matches-without-winning-ipl | IPL 2023 : अजिंक्य रहाणेने १७२ सामन्यानंतर जिंकली ट्रॉफी; जाणून घ्या २०० सामने खेळूनही कोणाची पाटी कोरी 

IPL 2023 : अजिंक्य रहाणेने १७२ सामन्यानंतर जिंकली ट्रॉफी; जाणून घ्या २०० सामने खेळूनही कोणाची पाटी कोरी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने पटकावले... अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सवर ५ विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) या मोसमात जबरदस्त खेळ केला आणि CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फायनलमध्ये त्याने दमदार फटकेबाजी केली.  १७२ सामने खेळल्यानंतर अजिंक्यला आयपीएल ट्रॉफी उंचावता आली. पण, अजिंक्य सोडला तर असे अनेक खेळाडू आहे की ज्यांची आयपीएल जिंकण्याची प्रतीक्षा केव्हा संपेल देव जाणे... 


विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने २०० हून अधिक सामने खेळूनही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. त्याने आतापर्यंत २३७ खेळले आहेत. कोहली २००८ पासून आयपीएलचा भाग आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. तो तीन फायनल खेळला आहे, पण त्यात त्याला विजय मिळाला नाही. त्याच्यानंतर एबी डिव्हिलियर्सचे नाव येते ज्याने १८४ आयपीएल सामने खेळले, पण ट्रॉफी जिंकली नाही. विशेष म्हणजे कोहली आणि एबीडी दोघेही RCBसाठी अनेक वर्षे एकत्र खेळायचे. डिव्हिलियर्स दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा देखील भाग होती. 
कोहलीचा संघ आरसीबी पुढच्या वर्षी आयपीएल जिंकला तरी त्याला  किमान २५० सामने खेळून ट्रॉफी उचलण्याची संधी मिळेल.    


विराट कोहली - 237
एबी डिव्हिलियर्स - 184
अमित मिश्रा - 161
संजू सॅमसन - 152
युजवेंद्र चहल - 145
ख्रिस गेल - 142
अक्षर पटेल - 136
ग्लेन मॅक्सवेल - 124
मयंक अग्रवाल - 123

Web Title: IPL 2023 : Ajinkya-rahane-win-ipl-trophy-after-172-matches, check the list of players most-matches-without-winning-ipl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.