Join us  

IPL 2022: ग्लेन मॅक्सवेल या सामन्यापासून बंगळुरूकडून खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी दिली माहिती

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा हनिमून आटोपल्यानंतर येत्या शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरसीबीचे मुख्य कोच माइक हेसन यांनी मंगळवारी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 8:41 AM

Open in App

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा हनिमून आटोपल्यानंतर येत्या शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरसीबीचे मुख्य कोच माइक हेसन यांनी मंगळवारी दिली.आवश्यक क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतरही  मॅक्सवेल  ऑस्ट्रेलियाचा करारबद्ध खेळाडू असल्याने अटी आणि शर्तींमुळे मॅक्सवेल हा मंगळवारी राजस्थानविरुद्ध सामना खेळू शकला नाही. मॅक्सवेल हा पाक दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नसला तरी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला ६ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावीच लागेल.आरसीबीच्या अधिकृत ट्विटरपेजवर हेसन म्हणाले, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्ट निर्देश आहेत की, ऑस्ट्रेलियाचा एकही करारबद्ध खेळाडू ६ एप्रिलआधी आयपीएल सामना खेळणार नाही. 

त्यामुळे मॅक्सवेल येथे आधीच पोहोचला तरी तो निर्धारित कालावधीआधी मैदानात खेळताना दिसणार नाही. अन्य सर्वच संघांना हा नियम माहीत असल्याने सर्वांनी त्यानुसार योजना आखल्या आहेत.  मॅक्सवेल ९ एप्रिल रोजी आरसीबीकडून पहिला सामना खेळेल.’ आरसीबीने यंदा दोन सामने खेळले असून त्यातील एक जिंकला तर एक गमावला.

हेजलवूड आठवड्यानंतर दाखल होणारऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा एका आठवड्यानंतर आरसीबीच्या ताफ्यात दाखल होईल. तो सध्या पाकिस्तान दौऱ्यात संघासोबत आहे. पुढील काही दिवसात तो भारतात दाखल होणार असून, तीन दिवस क्वारंटाइन राहणार आहे.  हेजलवूड १२ एप्रिल रोजी सीएसकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :ग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२२
Open in App