Harpreet Brar, IPL 2022 : प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् मग पुढे जे झालं ते...

पंजाब  किंग्सने मात्र मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली दणक्यात सुरूवात केली. त्यांनी २०५ धावांचे लक्ष्य यशस्वी पार करून अन्य फ्रँचायझींना धोक्याचा इशारा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:27 PM2022-03-31T18:27:11+5:302022-03-31T18:28:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 : When PBKS star Harpreet Brar's tweet on former adult star Mia Khalifa went viral | Harpreet Brar, IPL 2022 : प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् मग पुढे जे झालं ते...

Harpreet Brar, IPL 2022 : प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् मग पुढे जे झालं ते...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harpreet Brar, IPL 2022 :  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला दणक्यात सुरूवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ससारख्या तगड्या संघांना पराभव पत्करावा लागला आहे. पंजाब  किंग्सने मात्र मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली दणक्यात सुरूवात केली. त्यांनी २०५ धावांचे लक्ष्य यशस्वी पार करून अन्य फ्रँचायझींना धोक्याचा इशारा दिला आहे. पण, पंजाब किंग्स एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेला आलं आहे आणि त्याला हरप्रीत ब्रार ( Harpreet Brar) हा कारणीभूत ठरतोय. पंजाब किंग्सच्या या खेळाडूने मागच्या पर्वात विराट कोहलीची विकेट घेतली होती. हा अष्टपैलू खेळाडू सोशल मीडियावरील त्याच्या एका ट्विटने चर्चेत आला आहे.  

२०२१च्या सुरुवातीला ब्रार याने अडल्ट स्टार मिया खलिफा ( adult star Mia Khalifa ) हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचं ते ट्विट प्रचंड व्हायरल झालं होतं. ११ फेब्रुवारी २०२१ला त्याने हे ट्विट केलं होतं. त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी जबरदस्त ट्रोल केले होते.  


ब्रारने हे ट्विट डिलीट करण्याचा विचार मनात आणला होता, परंतु त्याला कोणितरी तसं नको करू असे सांगितले. ब्रारनेही या ट्रोल्सच्या भरपूर मजा घेतली.  



Web Title: IPL 2022 : When PBKS star Harpreet Brar's tweet on former adult star Mia Khalifa went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.