IPL 2022 RCB vs KKR Live : नाणेफेकीचा कौल RCBच्या बाजूने लागला; फॅफ ड्यू प्लेसिसला रोखण्यासाठी KKRने भारी गोलंदाज उतरवला

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: पहिला सामना गमावल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात मुसंडी मारण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:04 PM2022-03-30T19:04:39+5:302022-03-30T19:07:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Royal Challengers Bangalore won the toss and elected to field, know playing XI  | IPL 2022 RCB vs KKR Live : नाणेफेकीचा कौल RCBच्या बाजूने लागला; फॅफ ड्यू प्लेसिसला रोखण्यासाठी KKRने भारी गोलंदाज उतरवला

IPL 2022 RCB vs KKR Live : नाणेफेकीचा कौल RCBच्या बाजूने लागला; फॅफ ड्यू प्लेसिसला रोखण्यासाठी KKRने भारी गोलंदाज उतरवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: पहिला सामना गमावल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात मुसंडी मारण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) उत्सुक आहे. आज त्यांच्यासमोर तगड्या कोलकाता नाईट रायडर्सचे (  Kolkata Knight Riders)  आव्हान असणार आहे. KKRने सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आहे. नाणेफेकीचा कौल RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने पहिल्या सामन्यात सीएसकेवर सहा गड्यांनी मात केली.  दुसरीकडे आरसीबीने २०० वर धावा करूनही त्यांचा पंजाब किंग्सकडून पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पंजाबविरुद्ध ५७ चेंडूत ८८ धावा केल्या. सलामीचा अनुज रावत मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळा झालेल्या विराट कोहलीने देखील चांगल्या फॉर्मचे संकेत दिले. आरसीबीला विजय मिळवायचा झाल्यास दिनेश कार्तिकलादेखील योगदान द्यावे लागेल.

आरसीबीच्या गोलंदाजांची मात्र पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई केली होती. मोहम्मद सिराजने ५९ धावा दिल्या. डेथ ओव्हरमध्ये हर्षल पटेलकडे धावा रोखण्याची जबाबदारी असेल. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगाच्यापुढे गडी बाद करण्याचे आव्हान असेल. केकेआरने पहिल्या सामन्यात सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने केवळ १६ धावा केल्या. मात्र, तो मोठी खेळी करण्यास सक्षम आहे.  मधल्या फळीत श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स आणि  शेल्डन जॅक्सन यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल.

गोलंदाजीत मागच्या सामन्यात उमेश यादवने चोख कामगिरी बजावली. त्याचवेळी शिवम मावी, फिरकीपटू चक्रवर्ती आणि  सुनील नारायण यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.  अष्टपैलू आंद्रे रसेल हा फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार ठरल्यास  सामन्यात मोठा फरक निर्माण होऊ शकतो. KKRने आजच्या सामन्यात टीम साऊदीला पदार्पणाची संधी दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स - अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरीन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती ( KKR 11: Rahane, Venkatesh Iyer, Nitish Rana, Shreyas Iyer(c), Sam Billings, Sheldon Jackson(w), Russell, Narine, Tim Southee, Umesh Yadav, Varun Chakaravarthy)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फॅफ ड्यू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रुथरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विलि, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज ( RCB 11: Faf(c), Anuj Rawat, Virat, Dinesh Karthik(w), Rutherford, Shahbaz Ahmed, Hasaranga, David Willey, Harshal Patel, Akash Deep, Siraj) 

Web Title: IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Royal Challengers Bangalore won the toss and elected to field, know playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.