IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) डी वाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) बॅकफूटवर फेकले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीप, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज व डेव्हिड व्हीली यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. KKRचे 6 फलंदाज 67 धावांवर माघारी पाठवून RCBने सामन्यावर पकड घेतली, आंद्रे रसेलने थोडी फटकेबाजी केली, परंतु ती आव्हानात्मक लक्ष्य उंभं करण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
RCBने पहिल्या 7 षटकांत KKRची कोंडी केली. आकाश दीप ( Akash Deep) हा RCBसाठी सप्राईज पॅकेज ठरला आणि त्याने KKRच्या दोन प्रमुख फलंदाजांना बाद करून मोठं काम केलं. वेंकटेश अय्यर व अजिंक्य रहाणे यांना मुक्तपणे खेळू देत नाही. चौथ्या षटकात सिराजच्या जागी आकाश दीपला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर वेंकटेशला ( 10) कॉट अॅन बोल्ड केले. सिराजने अजिंक्यला (9) माघारी पाठवले. नितीश राणाने पहिलाच चेंडू सीमारेषेपार भिरकावला, परंतु आकाश दीपने पाचव्या चेंडूवर त्याला माघारी पाठवून KKRला मोठा धक्का दिला.
वनिंदू हसरंगाने जलवा दाखवला आणि त्याने तीन विकेट्स घेताना KKRची अवस्था 6 बाद 67 अशी दयनीय केली. श्रेयस अय्यर ( 13), सुनील नरीन ( 12) व शेल्डन जॅक्सन ( 0) यांना वनिंदूने बाद केले. KKRच्या 10 षटकांत 6 बाद 76 धावा झाल्या होत्या. धडधड विकेट घेतल्यानंतर RCBने 12व्या षटकात प्रमुख गोलंदाज आणला. हर्षल पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात KKR च्या सॅम बिलिंग्सला ( 14) बाद केले. आंद्रे रसेल हा KKRची शेवटची होप होता, त्याने 3 खणखणीत षटकार खेचून KKRच्या फॅन्सना दिलासाही दिला. पण, हर्षल पटेलने त्याची ( 25) विकेट घेतली. हसरंगाने 20 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स टिपल्या. पटेलने 11 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांनी अखेरची चार षटकं खेळून काढताना कोलकाताला 18.5 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. आकाशने 45 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. यादव व चक्रवर्थी यांनी आजच्या सामन्यातील सर्वोत्तम 27 धावांची भागीदारी केली.