MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याचे दडपण न घेता त्यांनी लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना बदडवून काढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:44 PM2022-03-31T21:44:08+5:302022-03-31T21:44:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : MS Dhoni smash unbeaten 16 runs in just 6 ball, he completes 7,000 runs in T20 cricket | MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याचे दडपण न घेता त्यांनी लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना बदडवून काढले. रॉबिन उथप्पाने पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचून इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी हात साफ केले. महेंद्रसिंग धोनीही ( MS Dhoni) मागे राहिला नाही. मैदानावर येताच त्याने आवेश खानचा चेंडू षटकार खेचला, त्यानंतर चौकार मारला... धोनीचा ही फटकेबाजी पाहून प्रेक्षकही नाचू लागले. धोनीने या सामन्यात ६ चेंडूंत नाबाद १६ धावा करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.   

ऋतुराज गायकवाड  ( १) लगेच धावबाद होऊन माघारी परतला तरी उथप्पा व मोईन अलीने चांगली फटेकाबी केली. दोघांनी चेन्नईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ७३ धावा उभारून दिल्या.  उथप्पा २७ चेंडूंत ८ चौकार व १ खणखणीत षटकार खेचून ५० धावांवर LBW झाला.  मोईन अली २२ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. अलीच्या विकेटनंतर चेन्नईच्या धावगतीवर रोख लावण्याची लखनौला संधी होती, परंतु क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे चेन्नईला सहज चौकार मिळाले. त्यामुळे अंबाती रायुडू व शिवम दुबेचा आत्मविश्वास उंचावला. रवी बिश्नोईने ही ६० धावांची भागीदारी करणारी जोडी तोडली व रायुडू २७ धावांवर बाद झाला. दुबे ४९ धावांवर असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांनी या धावा कुटल्या. रवींद्र जडेजा ९ चेंडूवर १७ धावा करून बाद झाला.

महेंद्रसिंग धोनीचा जलवा अन् विक्रम...


 


आयपीएलमध्ये  १९व्या षटकात सर्वाधिक ३८ षटकार खेचण्याचा विक्रम धोनीने नावावर केला.  पण, त्याच्या या १६ धावांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारा तो  ( Indian players with 7000 T20 runs) सहावा भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहली ( १०३२६), रोहित शर्मा ( ९९३६), शिखर धवन ( ८८१८), सुरेश रैना ( ८६५४) व रॉबिन उथप्पा ( ७०७०) यांनी हा पराक्रम केला आहे.  

धोनीच्या ७००० धावांची विभागणी
४६८७ धावा - चेन्नई सुपर किंग्स
१६१७ धावा - भारत
५७४ धावा - रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१२३ धावा - झारखंड

 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : MS Dhoni smash unbeaten 16 runs in just 6 ball, he completes 7,000 runs in T20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.