Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : रॉबिन उथप्पाची ( Robin Uthappa) दमदार सुरूवात, मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांची मिळालेली साथ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:22 PM2022-03-31T21:22:48+5:302022-03-31T21:24:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Chennai Super Kings finish with 210/7 vs Lucknow Super Giants   | Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : रॉबिन उथप्पाची ( Robin Uthappa) दमदार सुरूवात, मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांची मिळालेली साथ... चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सच्या ( Lucknow Super Giants) गोलंदाजांची वाट लावली. रॉबिनने ताबडतोड अर्धशतक झळकावल्यानंतर अन्य फलंदाजांचे मनोबल उंचावले आणि फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. १९व्या षटकात मैदानावर उतरलेल्या महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni)  पहिल्या दोन चेंडूवर ६ व ४ मारून लखनौची अवस्था पार बेक्कार केली... 


रॉबिन उथप्पाने ( Robin Uthappa) षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचले आणि मनसूबे स्पष्ट केले. उथप्पाची फटकेबाजी सुरूच होती, परंतु ऋतुराज गायकवाड लगेच बाद झाला. अँड्य्रू टायच्या गोलंदाजीवर धाव घेण्यासाठी ऋतुराजने क्रिज सोडली, परंतु उथप्पाने त्याला माघारी पाठवले. तोपर्यंत रवी बिश्नोईने चपळाईने क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजला रन आऊट केले. या विकेटनंतरही उथप्पाची बॅट मंदावली नाही आणि त्याला मोईन अलीची साथ मिळाली. चेन्नईने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ७३ धावा करून यंदाच्या पर्वातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. कृणाल पांड्याने टाकलेल्या ६व्या षटकात १६ आणि अँड्य्रू टायने टाकलेल्या ५व्या षटकात या दोघांनी १८ धावा कुटल्या. उथप्पाचा हा झंझावात ८व्या षटकात रवी बिश्नोईने रोखला. उथप्पा २७ चेंडूंत ८ चौकार व १ खणखणीत षटकार खेचून ५० धावांवर LBW झाला.  
 
दोन षटकांत २१ धावा देणाऱ्या आवेश खानने ११व्या षटकात चांगले कमबॅक केले. त्याने पहिल्याच चेंडूवर मोईन अलीचा त्रिफळा उडवला. अली २२ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. अलीच्या विकेटनंतर चेन्नईच्या धावगतीवर रोख लावण्याची लखनौला संधी होती, परंतु क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे चेन्नईला सहज चौकार मिळाले. त्यामुळे अंबाती रायुडू व शिवम दुबेचा आत्मविश्वास उंचावला. १६व्या षटकात दुबेचा झेल दुष्मंथा चमिराने सोडला आणि गोलंदाज कृणाल पांड्या नाराज झाला. रायुडू व दुबे यांनी ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. बिश्नोईने ही ६० धावांची भागीदारी करणारी जोडी तोडली व रायुडू २७ धावांवर बाद झाला.

दुबेने दमदार फटकेबाजी केली. दुबे ४९ धावांवर असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांनी या धावा कुटल्या. रवींद्र जडेजा ९ चेंडूवर १७ धावा करून बाद झाला. धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६ धावा चोपून चेन्नईला ७ बाद २१० धावांपर्यंत मजल मारून दिली.

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Chennai Super Kings finish with 210/7 vs Lucknow Super Giants  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.