Join us  

Hardik Pandya, IPL 2022 SRH vs GT Live Updates : हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट झालेला नाही?; आजच्या सामन्यात घेतला महत्त्वाचा निर्णय 

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात प्ले ऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलेले दोन संघ आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 7:24 PM

Open in App

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात प्ले ऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलेले दोन संघ आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. गुजरात टायटन्सने ( GT) सातपैकी सहा सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने ( SRH) मागील पाचही सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यामुळे या फॉर्मात असलेल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादने सात सामन्यांत प्रथमच नाणेफेक गमावली आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) केलेल्या विधानाने त्याच्या फिटनेसबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

२०१९साली शस्त्रक्रिया झाल्यानंतर हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलमध्ये तो खेळला, परंतु त्याने गोलंदाजी केली नाही. तरीही त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघासाठीच्या संघात स्थान मिळाले आणि त्याचा फायदा कमी फटकाच संघाला बसला. भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करतोय आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली संघा ने १२ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. पण, त्याच्या तंदुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मागील लढतीत हार्दिकने ६७ धावांची खेळी केली, परंतु दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानावर आला नाही. फलंदाजी करताना त्याने फिजिओकडून प्राथमिक उपचारही घेतले होते. त्याने गोलंदाजीही केली नव्हती. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळलाही नाही. राशिद खानने संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यात आज SRHविरुद्ध गोलंदाजी करणार का, या प्रश्नावरील त्याचे उत्तर तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. तो म्हणाला, आमच्याकडे गोलंदाजांची फौज आहे. त्यामुळे जर गरज पडेल तरच मी गोलंदाजी करेन अन्यथा नाही.  

गुजरात टायटन्स - शुबमन गिल, वृद्धीमान सहा, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, राशिद खान, अल्झारी जोसेफ, ल्युकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल ( Gujarat Titans 1 Shubman Gill, 2 Wriddhiman Saha (wk), 3 Hardik Pandya (capt.), 4 David Miller, 5 Rahul Tewatia, 6 Abhinav Manohar, 7 Rashid Khan, 8 Alzarri Joseph, 9 Lockie Ferguson, 10 Mohammed Shami, 11 Yash Dayal)

सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पुरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को येनसन, उम्रान मलिक, टी नटराजन ( Sunrisers Hyderabad 1 Kane Williamson (capt.), 2 Abhishek Sharma, 3 Rahul Tripathi, 4 Aiden Markram, 5 Nicholas Pooran (wk), 6 Shashank Singh, 7 Washington Sundar, 8 Bhuvneshwar Kumar, 9 Marco Jansen, 10 Umran Malik, 11 T Natarajan) 

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App