Join us  

Ravichandran Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनची बॅटिंग स्टाईल पाहून सारेच चक्रावले; IPL मधील पहिले अर्धशतक झळकावले, Video 

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : रिषभ पंतने नाणेफेक जिंकली, दिल्ली कॅपिटल्स प्रथम गोलंदाजी करणार, राजस्थान रॉयल्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचे आव्हान आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 8:47 PM

Open in App

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : जोस बटलर व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव आर अश्विनने ( R Ashwin) सावरला आहे. तिसऱ्याच षटकात बटलरची विकेट पडल्यानंतर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय यशस्वी ठरला. दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अश्विनने नवी बॅटिंग स्टाईल शोधली आणि ती पाहून सारेच चक्रावले. 

रिषभ पंतने नाणेफेक जिंकली, दिल्ली कॅपिटल्स प्रथम गोलंदाजी करणार, राजस्थान रॉयल्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचे आव्हान आहे. चेतन सकारिया व ललित यादव हे खलिल अहमद व रिपल पटेल यांच्या जागी दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील, तर शिमरोन हेटमायर मायदेशात परतल्यामुळे राजस्थानने रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला संधी दिली आहे. DC विरुद्ध मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या जोस बटलरला ( ७) आज चेतन सकारियाने तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले.  RRने धाडसी निर्णय घेताना आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि त्यानेही काही सुरेख फटके मारले. त्याला रोखण्यासाठी अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले, परंतु रिषभ पंतनेच झेल सोडला. राजस्थानने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ४३ धावा केल्या. 

यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु मिचेल मार्शने त्याला चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. जैस्वाल १९ धावांवर बाद झाला. अश्विन व जैस्वाल यांनी ४३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कल व अश्विन यांनी फटकेबाजी केली. अश्विनची स्टाईल पाहून कुलदीप यादवही चक्रावला. नेमकी गोलंदाजी कशी करावी हेच त्याला सुचेना. अश्विननने याचाच फायदा घेताना चांगले फटके मारले. अश्विनने ३७ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत ४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. पण, पुढच्याच चेंडूवर मार्शने त्याची विकेट घेतली.   ( पाहा IPL 2022 - RR vs DC  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२आर अश्विनराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App