Join us  

IPL 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं दिला धक्का; जाणून घ्या दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्सचे रिटेन खेळाडू 

Indian Premier League 2022 Retention Live Updates :  जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व लिएम लिव्हिंगस्टोन या तगड्या खेळाडूंना रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं ( RR) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:35 PM

Open in App

Indian Premier League 2022 Retention Live Updates :  जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व लिएम लिव्हिंगस्टोन या तगड्या खेळाडूंना रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं ( RR) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी केवळ तीन खेळाडूंना कायम राखले आहे. दिल्ली कॅपिटल्सन व कोलकाता नाइट रायडर्स यांनीही प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आणि त्यात काही प्रमुख खेळाडूंची नाव गायब आहेत.

  • राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी)      
  • कोलकाता नाइट रायडर्स -  आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी),  वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी)  
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी),  पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी)  

रिटेशन नियम 

  • बीसीसीआयनं  प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. 
  • बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. 
  • समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.
  • चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. 
  • तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. 
  • दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन  केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.

 

टॅग्स :आयपीएल २०२१बेन स्टोक्सजोफ्रा आर्चरराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App