Join us  

IPL 2022 Retention Live Updates : लोकेश राहुलचा पंजाब किंग्ससोबतचा प्रवास संपला; फ्रँचायझीनं दोनच खेळाडूंना कायम राखले 

Indian Premier League 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी संघात चार खेळाडू कायम राखण्याची 8 फ्रँचायझींची मुदत आज संपली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 9:55 PM

Open in App

Indian Premier League 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी संघात चार खेळाडू कायम राखण्याची 8 फ्रँचायझींची मुदत आज संपली. अहमदाबाद व लखनौ या फ्रँचायझीच्या समावेशामुळे खेळाडूंचे लिलाव होत आहे.  पंजाब किंग्सनं ( PBKS) लोकेश राहुलला रिलिज केले. पण, त्यांनी ताफ्यात दोनच खेळाडूंना कायम राखण्याचा निर्णय घेतल्यानं रवी बिश्नोई, शाहरुख खान, निकोलस पूरन यांचा पत्ता कट झाला आहे. शाहरुखनं नुकत्याच पार पडलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीत तामीळनाडूला  रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.  

  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली
  • कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन, अब्दुल समद, उम्रान मलिक 
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे,
  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी) 

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलपंजाब किंग्स
Open in App