IPL 2022 Retention : लोकेश राहुल, राशिद खान यांच्यावर  IPL 2022खेळण्यास बंदी?; रवींद्र जडेजावर यापूर्वी झालीय अशी कारवाई

सध्या असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी ३ जणांना Mega Auction पूर्वी करारबद्ध करता येणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:15 PM2021-11-30T14:15:51+5:302021-11-30T14:16:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Retention : KL Rahul, Rashid Khan to be Banned from IPL 2022?  Ravindra Jadeja copped a one-year ban for negotiating his IPL contract | IPL 2022 Retention : लोकेश राहुल, राशिद खान यांच्यावर  IPL 2022खेळण्यास बंदी?; रवींद्र जडेजावर यापूर्वी झालीय अशी कारवाई

IPL 2022 Retention : लोकेश राहुल, राशिद खान यांच्यावर  IPL 2022खेळण्यास बंदी?; रवींद्र जडेजावर यापूर्वी झालीय अशी कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी ( IPL 2022) मेगा ऑक्शनच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींमुळे Mega Auction होणार आहे आणि त्यासाठी सध्या संघात असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखता येणार आहे. आज ८ फ्रँचायझींना दिलेली मुदत संपत आहे आणि रात्रीपर्यंत प्रत्येक संघानं त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम राखले हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, लोकेश राहुल ( KL Rahul ) व राशिद खान ( Rashid Khan) यांच्यावर बंदीच्या कारवाईची शक्यता वर्तवणारे वृत्त चर्चिला जात आहे. त्यात किती तथ्य आहे, हे जाणून घेऊयात...

सध्या असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी ३ जणांना Mega Auction पूर्वी करारबद्ध करता येणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते २५ डिसेंबर ही मुदत दिली आहे. पण, या मुदतीआधीच लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुल व राशिद खान यांच्याशी बोलणी सुरू केली. त्यामुळे पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) या फ्रँचायझीविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ''आमच्याकडे लेखी तक्रार आलेली नाही, परंतु दोन फ्रँचाझींनी लखनौ संघाविरोधात तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि तसं काही घडलं असेल तर कारवाई केली जाईल,''असे बीसीसीआय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले,''आम्हाला संतुलन बिघडवायचे नाही. कट्टर स्पर्धा असताना तुम्ही अशा गोष्टी टाळू शकत नाहीत, परंतु सध्या खेळत असलेला संघ संघाचे संतुलन बनवण्याचा प्रयत्न करत असताना असे करणे चुकीचे आहे.''

लोकेश राहुल व राशिद खान यांच्यावर बंदी घातली जाईल का?
२०१०मध्ये रवींद्र जडेजावर एका वर्षाची बंदी घातली गेली होते. २००८मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जडेजावर  नियम मोडल्यामुळे ही बंदीची कारवाई करण्यात आली होती.  २००८मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या जडेजाला राजस्थाननं आपल्या ताफ्यात घेतले होते.  त्यानं आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रात १३१.६च्या स्ट्राईक रेटनं ४३०  धावा केल्या होत्या. त्याच्यासाठी RRनं ३० हजार डॉलर मोजले होते आणि जडेजाला पुढील पर्वात ही रक्कम वाढवून हवी होती. RRला २०१०पर्यंत जडेजाला ताफ्यात कायम ठेवायचे होते, परंतु २००९मध्ये त्यानं अन्य संघांशी बोलणी सुरू केली आणि त्याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. पण, लोकेश व राशिद यांच्यावर बंदी घातली जाणार नाही. त्यामुळे त्यांच्यावरील बंदीच्या बातम्या चुकीच्या आहेत.
 

Web Title: IPL 2022 Retention : KL Rahul, Rashid Khan to be Banned from IPL 2022?  Ravindra Jadeja copped a one-year ban for negotiating his IPL contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.