Join us  

Jonny Bairstow Liam Livingstone IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १४ षटकार, १६ चौकार; जॉनी बेअरस्टो अन् लिएम लिव्हिंगस्टोनच्या फटकेबाजीने RCBला केले बेहाल

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates :  प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाब किंग्सने आज धडाकेबाज सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 9:26 PM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates :  प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाब किंग्सने आज धडाकेबाज सुरूवात केली. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) नेमकं आज काय खाऊन आलेला तेच कळेनासे झाले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) गोंलंदाजांना चांगलेच चोपून काढले. शिखर धवननेही हात साफ केले. पंजाबचे सलामीवीर आज फुल चार्ज होऊनच मैदानावर उतरले होते. त्यात बेअरस्टोची फटकेबाजी RCBची डोकेदुखी वाढवणारी ठरली. त्यात लिएम लिव्हिंगस्टोननेही ( Liam Livingstone) अर्धशतक झळकावून RCBसमोर तगडे आव्हान उभे केले. बेअरस्टो व धवन यांनी ३.५ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  ५व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने  PBKSला पहिला धक्का दिला. धवनला ( २१) मॅक्सवेलने त्रिफळाचीत करून ६० धावांवर पंजाबला धक्का दिला.

बेअरस्टोची फटकेबाजी काही थांबली नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या पुढच्याच षटकात चार खणखणीत षटकात खेचले आणि २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबने पहिल्या सहा षटकांत १ बाद ८३ धावा कुटल्या. पंजाब किंग्सची ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी १ बाग ८६ धावा केल्या होत्या. २०११मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धचा  (१ बाद ७७) विक्रम आज मोडला गेला. 

भानुका राजपक्षा  ( १) याला वनिंदू हसरंगाने स्वस्तात माघारी पाठवल्यानंतरही बेअरस्टोची फटकेबाजी थांबली नाही. त्याला नशिबानेही साथ दिली. दिनेश कार्तिककडून स्टम्पिंगच्या संधी सुटल्या. अखेर १०व्या षटकात बेअरस्टोचे वादळ रोखण्यात RCBला यश आले. शाहबाज अहमदने ही महत्त्वाची विकेट घेतली. बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोन फटकेबाजीच्या मूडमध्ये दिसला आणि त्यामुळे कर्णधार मयांक अग्रवाल सावध खेळ करत होता. त्याने शाहबाज अहमदला मारलेला १००+ मीटर लांब षटकात पाहण्यासारखा होता. अग्रवालसह त्याने ५१  धावांची भागिदारी केली. अग्रवाल ( १९) धावांवर बाद झाला. 

हसरंगाने पंजाबला आणखी एक धक्का देताना जितेश शर्माला ( ९ ) बाद केले. पंजाबचा प्रत्येक फलंदाज आज फटकेबाजीच्याच मूडमध्ये दिसला. लिव्हिंगस्टोनने ३५ चेंडूंत आयपीएलमधील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. जोश हेझलवूडने टाकलेल्या १९व्या षटकात लिव्हिंगस्टोनने २३ धावा कुटल्या. हेझलवूडने ४ षटकांत ६४ धावा दिल्या आणि आयपीएल इतिहासातिल RCB कडून ही सर्वात महागडी कामगिरी ठरली. २०व्या षटकात हर्षल पटेलने लिव्हिंगस्टोनची विकेट घेतली. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा चोपल्या. पंजाबने ९ बाद २०९ धावा कुटल्या.  ( पाहा IPL 2022 - RCB vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App