Join us  

IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : अनपेक्षित पाहुण्याच्या येण्याने थांबवावा लागला सामना, Faf du Plessisच्या नजरेतून नाही झाली सुटका!

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:07 PM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती. पण, कागिसो रबाडा व रिषी धवन यांनी RCBच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून मोठा धक्का दिला. दरम्यान, RCBच्या डावातील पहिल्याच षटकात अनपेक्षित पाहुण्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. समोरच्या साईट स्क्रीनवर हा पाहुणा बिनधास्त बसला होता आणि तो कोणाला दिसतही नव्हता, परंतु फॅफच्या बारीक नजरेने त्याला हेरले आणि अम्पायर कामाला लागले. 

जॉनी बेअरस्टो व शिखर धवन यांनी ३.५ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. धवन २१ धावांवर माघारी परतला आणि पहिल्या विकेटसाठीची ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पंजाबने पहिल्या सहा षटकांत १ बाद ८३ धावा कुटल्या. पंजाब किंग्सची ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी १ बाग ८६ धावा केल्या होत्या.  बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोन फटकेबाजीच्या मूडमध्ये दिसला आणि त्यामुळे कर्णधार मयांक अग्रवाल सावध खेळ करत होता. अग्रवालसह त्याने ५१  धावांची भागिदारी केली. अग्रवाल ( १९) धावांवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा चोपल्या. पंजाबने ९ बाद २०९ धावा कुटल्या. हर्षल पटेलने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगाने १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेल व शाहबाद अहमद यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.या सामन्याआधी विराट कोहलीच्या नावावर २१९ सामन्यांत ३६.३१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५६६ चौकार व २१४ षटकार खेचले आहेत.

त्याच्यानंतर शिखर धवन ६१८६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये ६५०० धावा करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला. तसेच ट्वेंटी-२०त १०५०० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजही तोच ठरला. कागिसो रबाडाने चौथ्या षटकात RCBला मोठा धक्का दिला. सुरेख फटका मारणाऱ्या विराटला त्याने बाद केले. २० धावांवर माघारी परतताना विराटही देवाकडे जाब विचारताना दिसला. पुढील षटकात रिषी धवनने फॅफला ( १०) व महिपाल लोमरोर ( ६) यांना बाद करून PBKSला मोठे यश मिळवून दिले. ( पाहा IPL 2022 - RCB vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीएफ ड्यु प्लेसीसरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स
Open in App