IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्या कर्णधारासह दोन संघ आता डी वाय पाटील स्टेडियमवर उतरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स ( Royal Challengers Bangalore Vs Punjab Kings) असा हा सामना रंगणार आहे. विराट कोहली ( Virat Kohli) ९ वर्षांत प्रथमच RCBचा खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे. यंदा फॅफ ड्यू प्लेसिसकडे RCBकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पंजाब किंग्सही ( PBKS) मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला विराट खोऱ्याने धावा काढून RCB ला पहिले जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असेल. विराटने २०१३ ला न्यूझीलंडचा डॅनियल व्हेट्टोरीकडून नेतृत्व स्वीकारले. आठ सत्रात नेतृत्व केल्यानंतर जबाबदारीतून तो मोकळा झाला. कोहलीच्या नेतृत्वात संघाने २०१६ ला उपविजेतेपदाचा मान मिळवला होता. त्यावेळी विराटने चार शतकांसह ९०० धावा काढल्या होत्या.
RCB चा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शेरफाने रुथरफोर्ड, विराट कोहली, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दिप.