IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला साजेशी सुरूवात करता आली ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:41 PM2022-04-19T22:41:03+5:302022-04-19T22:42:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, RCB vs LSG Live Updates : What a review by RCB, magnificent one, KL Rahul is dismissed for 30, Harshal Patel strikes, see reaction of Athiya Shetty, Watch Video  | IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला साजेशी सुरूवात करता आली नाही. १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचे ३ फलंदाज ६४ धावांवर माघारी परतले. कर्णधार लोकेश राहुलची विकेट ही सर्वांना आश्चर्याचकीत करणारी ठरली. 

फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. लखनौ सुपर जायंट्ससमोर त्यांनी विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले. दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात अनुज रावत ( ४) व विराट कोहली  (०) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने ( २३) दमदार फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या ( Jason Holder) अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यापाठोपाठ होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना सुयश प्रभुदेसाईची विकेट घेऊन RCBची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. शाहबाज अहमद व  ड्यू प्लेसिस यांनी ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाज २६ धावांवर रन आऊट झाला.  फॅफने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावा केल्या. वर माघारी जावे लागले. जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली. RCBला ६ बाद १८१ धावा करता आल्या. 


दुसऱ्या डावात फॅफ मैदानावर न आल्याने विराट कोहली नेतृत्व करताना दिसला. लखनौला १७ धावांवर जोश हेझलवूडने पहिला धक्का दिला. क्विंटन डी कॉक लगेच माघारी परतला. काही षटकं विराटने नेतृत्व केल्यानंतर फॅफ पुन्हा मैदानावर परतला आणि कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली. पण, काही काळ का असेना विराटला पुन्हा नेतृत्व करताना पाहून चाहते सुखावले होते. हेझलवूडने पुढील षटकात LSGच्या मनीष पांडेची ( ६) विकेट घेत RCBला मोठे यश मिळवून दिले. लखनौनेही अनपेक्षित चाल खेळताना कृणाल पांड्याला फलंदाजीला पाठवले. डाव्या-उजव्या जोडीने RCBची डोकेदुखी वाढवण्याचा त्यांचा डाव होता. दरम्यान, लोकेश राहुलने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडला.

डावाच्या ८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलने लखनौला मोठा धक्का दिला. हर्षल पटेलने डाव्या बाजूला चेंडू टाकला आणि तो यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती सहज विसावला. पण, कार्तिककडून काही अपील झाले नाही आणि अम्पायरनेही Wide सिग्नल दिला नाही. त्यानंतर RCBने DRS घेतला अन् त्यात चेंडू बॅटची हलकी किनार घेतल्याचे अल्ट्रा एजमध्ये समोर आले आणि लोकेशला  ३० धावांवर माघारी परतावे लागले. 



ट्वेंटी-२०त ६०००+धावा करणारे भारतीय फलंदाज - विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, गौतम गंभीर, मनीष पांडे व लोकेश राहुल. 

 

Web Title: IPL 2022, RCB vs LSG Live Updates : What a review by RCB, magnificent one, KL Rahul is dismissed for 30, Harshal Patel strikes, see reaction of Athiya Shetty, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.