Faf du Plessis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला दिला आकार 

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) धावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:23 PM2022-04-19T21:23:35+5:302022-04-19T21:29:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf Du Plessis - 96 runs from 64 balls; he missed maiden IPL century, LSG need 182 runs to win.  | Faf du Plessis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला दिला आकार 

Faf du Plessis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला दिला आकार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) धावला. पहिल्या षटकात दोन धक्के बसल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळ करून लखनौ सुपर जायंट्सला बॅकफूटवर फेकण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आले नाही. फॅफ ड्यू प्लेसिस एका बाजूने खिंड लढवत होता. त्याने शाहबाद अहमदसह ७० धावांची भागीदारी करून RCBचा पाया मजबूत केला. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या साथीने अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजीचा खेळ केला. त्याचे शतक थोडक्यात हुकले असले तरी त्याच्या खेळीने LSGसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. 

लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात RCBला दोन दणके दिले. अनुज रावतला ( ४) पाचव्या व विराट कोहलीला (०) सहाव्या चेंडूवर त्याने बाद केले. कोहलीने ( Virat Kohli)  चमिराने टाकलेल्या शॉर्ट लेंथ चेंडूवर  हलका फटका मारला, पंरतु दीपक हुडाने सहज झेल टिपला. २०१७नंतर आयपीएलमध्ये कोहली प्रथमच ( Golden Duck) शून्यावर बाद झाला. २००८ मध्ये आशिष नेहरा ( MI), २०१४मध्ये संदीप शर्मा ( PBKS) आणि २०१७मध्ये नॅथन कोल्टर नायल ( KKR) यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले होते.  

मॅक्सवेलने तिसऱ्या षटकात चमिराची धुलाई केली. फॅफ ड्यू प्लेसिसने हॅटट्रिक चेंडूवर चौकार खेचला अन् एक धाव करून मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर मॅक्सवेलने ४,४,६ अशी फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या ( Jason Holder) अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यापाठोपाठ होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना सुयश प्रभुदेसाईची विकेट घेऊन RCBची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात प्रभावी कामगिरी करणाऱ्या शाहबाजने कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिससह ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी डोईजड होईल असे वाटत असताना होल्डरने रन आऊट केला. शाहबाज २६ धावांवर माघारी परतला. दरम्यान, फॅफने ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

त्यानंतर फॅफने पुढील १८ चेंडूंत ४० धावा कुटल्या. फॅफने RCBला मजबूत स्थिती मिळवून दिली. २०व्या षटकात कार्तिकचा सोपा झेल मार्कस स्टॉयनिसने सोडला. फॅफला आयपीएलमधील शतक पूर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकात केवळ ६ धावा करायच्या होत्या. पण, पहिल्या चार चेंडूंवर त्याला दोनच धावा करता आल्या. पाचव्या चेंडूवर फॅफने जोरदार फटका मारला, परंतु यावेळेस स्टॉयनिसने चूक केली नाही. फॅफला ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावांवर माघारी जावे लागले.  जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली. RCBला ६ बाद १८१ धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf Du Plessis - 96 runs from 64 balls; he missed maiden IPL century, LSG need 182 runs to win. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.