Join us  

Golden duck for Virat Kohli, IPL 2022, RCB vs LSG Live Updates : अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराट कोहलीवर नामुष्की, Video

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस काही खास जातोय असे वाटत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 8:00 PM

Open in App

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस काही खास जातोय असे वाटत नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले आहेत. लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात RCBला दोन दणके दिले. अनुज रावतने चौथ्या चेंडूवर चौकार खेचून चमिराला ठसन दिली, परंतु पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट पडली. लोकेश राहुलने मिड ऑफला अफलातून झेल टिपला. त्यानंतर मैदानावर विराट कोहलीचे ( Virat Kohli) आगमन होताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. पण, तो क्षणिक ठरला. 

चमिराने टाकलेल्या शॉर्ट लेंथ चेंडूवर कोहलीने हलका फटका मारला, पंरतु दीपक हुडाने सहज झेल टिपला. २०१७नंतर आयपीएलमध्ये कोहली प्रथमच ( Golden Duck) शून्यावर बाद झाला. २००८ मध्ये आशिष नेहरा ( MI), २०१४मध्ये संदीप शर्मा ( PBKS) आणि २०१७मध्ये नॅथन कोल्टर नायल ( KKR) यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले होते.  

त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या षटकात चमिराची धुलाई केली. फॅफ ड्यू प्लेसिसने हॅटट्रिक चेंडूवर चौकार खेचला अन् एक धाव करून मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर मॅक्सवेलने ४,४,६ अशी फटकेबाजी केली. 

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स
Open in App