IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

IPL 2022 RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सवर ( KKR) विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:22 PM2022-03-31T22:22:18+5:302022-03-31T22:22:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs KKR : My girlfriend left me because I have more time for virat than her, funny poster goes viral  | IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सवर ( KKR) विजय मिळवला. २० धावांत ४ विकेट्स घेणारा वनिंदू हसरंगा या विजयाचा नायक ठरला. पण, १२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBलाही घाम गाळावा लागला. या सामन्यातील एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. एका चाहत्याची गर्लफ्रेंड विराट कोहलीमुळे ( Virat Kohli) त्याला सोडून गेली. 

हसरंगा,आकाश दीपने दोन, हर्षल पटेल दोन व  मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.  डेव्हिड विलीनेही टिच्चून मारा केला आणि कोलकाताचा संघ १८.५ षटकांत १२८ धावांत तंबूत परतला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांची १०व्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम ठरली.  माफक धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचे आघाडीचे तीनही फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. 

डेव्हिड विली ( १८) , शेर्फाने रुथरफोर्ड ( २८), शाहबाद अहमद ( २७) यांनी बंगळुरूसाठी संघर्ष केला. उमेश यादव ( २) व टीम साऊदी ( ३) यांनी दिलेल्या धक्क्यातून RCB कसेबसे सावरले. सुनील नरीन याने उत्तम गोलंदाजी केली आणि बंगळुरूला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. दिनेश कार्तिकने नाबाद १४  व हर्षल पटेलने नाबाद १० धावा करून बंगळुरूचा विजय साकारला. 

व्हायरल पोस्टरवर काय लिहिले होते?
 

माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडले, कारण तिच्यापेक्षा मी विराट कोहलीला देण्यासाठी माझ्याकडे जास्त वेळ आहे.


 

Web Title: IPL 2022 RCB vs KKR : My girlfriend left me because I have more time for virat than her, funny poster goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.