Join us  

Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates :  विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून RCBच्या विजयाचा पाया रचला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:20 AM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates :  विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून RCBच्या विजयाचा पाया रचला. पण, ही दोघंही मागे परतल्यानंतर गुजरात टायटन्सने पुनरागमनाचा प्रयत्न सुरू केला. राशिद खानने ( Rashid Khan) टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलची ( Glenn Maxwell) विकेट पडलीच होती, परंतु नशिबाने त्याला साथ दिली. चेंडू स्टम्प्सला घासून गेला आणि बेल्सची लाईट पेटली. परंतु बेल्स जागच्या जागी राहिल्या. हा प्रकार पाहून यष्टिरक्षक मॅथ्यू वेड व राशिद या दोघांनीही डोक्यावर हात मारला. तो चेंडू चौकार गेला. ( पाहा IPL 2022 - RCB vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

वृद्धीमान साहा ( ३१), कर्णधार हार्दिक पांड्या ( ६२*),  डेव्हिड मिलर ( ३४) व राशिद खानच्या ६ चेंडूंत नाबाद १९ धावांच्या जोरावर गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहली व फ‌ॅफ ड्यू प्लेसिस यांनी ११५ धावांची भागीदारी केली. फॅफ ३८ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला. विराट ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७३ धावांवर स्टम्पिंग झाला. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांची नाबाद खेळी करताना सामना १८.४ षटकांत संपवला. RCB ने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

RCBने या विजयासह पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आणले. या दोघांच्या खात्यात १२ गुण आहेत आणि एक सामना जिंकून ते १४ गुणच कमावू शकतील. राजस्थान रॉयल्स व RCB च्या खात्यात १६ गुण आहेत, परंतु नेट रन रेटच्या जोरावर राजस्थानने स्थान पक्के केले आहे. 

 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२२ग्लेन मॅक्सवेलविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्स
Open in App