Join us  

IPL 2022 RCB vs GT Live Updates : हार्दिक पांड्या- राशिद खान यांची १५ चेंडूंत फटकेबाजी, RCBसमोर उभे केले तगडे लक्ष्य

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये २० गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:25 PM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये २० गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, यासाठी कर्णधार हार्दिक पांड्याने हा निर्णय घेतला. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. हार्दिक व डेव्हिड मिलर यांची अर्धशतकी भागीदारी आणि हार्दिक व राशिद यांनी १५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारीच्या जोरावर गुजरातने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. 

फॉर्मात असलेल्या वृद्धीमान साहाने  चौकार-षटकार खेचून मनसुबे स्पष्ट केले. पण, तिसऱ्या षटकात जोश हेझलवूडने  टाकलेला अप्रतिम चेंडू शुबमन गिलच्या बॅटची किनार घेत दुसऱ्या स्लिपच्या दिशेने गेला. ग्लेन मॅक्सवेलने तितक्याच चपळाईने हनुमान उडी मारून एका हाताने चेंडू टिपला. त्यानंतर आलेला मॅथ्यू वेड ( १६) याला ग्लेन मॅक्सवेलने पायचीत केले. GT ची अवस्था २  बाद ३८ अशी झाली होती. पण, साहा चांगली फटकेबाजी करत होता. कर्णधार हार्दिक पांड्याने एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात साहाला रन आऊट केले. फॅफ ड्यू प्लेसिसच्या अचून थ्रो ने साहाला माघारी जाण्यास भाग पाडले. साहाने २२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या. पुढील षटकात हार्दिकला जीवदान मिळाले.

हार्दिक व डेव्हिड मिलर ( David Miller) यांनी विकेटची पडझड थांबवली, परंतु त्यांना अपेक्षित धावगती राखता नाही आली. या दोघांनी ४७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने १७व्या षटकात त्याच्याच गोलंदाजीवर मिलरला ( ३४ ) अफलातून रिटर्न कॅच घेतला. यासह हसरंगा आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक २५ विकेट्स  घेणारा गोलंदाज ठरला. राहुल तेवातिया ( २) आज फेल गेला, हेझलवूडने त्यालाही माघारी पाठवले. हार्दिकने अर्धशतक पूर्ण केले. राशिद खाननेही अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी केली. हार्दिक व राशिद यांनी १५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ४७ चेंडूंत ६२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ४ चौकार व ३ षटकार खेचले. राशिदने ६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद १९ धावा केल्या. गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सहार्दिक पांड्यारॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App