Join us  

Riyan Parag IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video 

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:06 PM

Open in App

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला अन् ट्रेंट बोल्टच्या सुसाट वेगाने वृद्धीमान साहाला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. बटलरच्या खेळीचं कौतुक होत असताना रियान पराग ( Riyan Parag)  पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी त्याने मॅच सुरू असतानाच आर अश्विनवर ( R Ashwin) नाराजी व्यक्त केली... याआधी कॅच पकडल्यानंतर त्याने नोंदवलेल्या निदर्शनामुळे त्याच्यावर टीका झाली होता.   (पाहा IPL 2022 - Qualifier 1 GT vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

मागील ७ सामन्यांत कुठेतरी हरवलेला जोस बटलर ( Jos Buttler) आज परतला. त्याने गुजरातच्या ( GT) गोलंदाजांचा पालापाचोळा केला. यशस्वी जैस्वाल ( ३) लगेच माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व बटलर यांनी ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. संजूने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूंत २८ धावांची खेळी केली. समोरील फलंदाज आक्रमक खेळ करत असतान बटलर मात्र शांत होता. १७व्या षटकात त्याने गिअर बदलला.. शांत असलेल्या वादळाने अचानक रुद्रावतार घेतला. त्याला रोखण्याची संधी हार्दिक व राशिदला मिळाली होती, परंतु त्यांनी ती गमावली.

बटलरने ३८ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील १८ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. बटलर ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर  रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला. आयपीएल २०२२ त ७०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

आज नेमकं काय झालं?२०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बटलर रन आऊट झाला. पण, तो चेंडू नो बॉल असल्याने RR ला फ्री हिट मिळाला. त्या चेंडूवर आर अश्विन स्ट्राईकवर होता. यश दयालने फ्री हिटवाला चेंडू Wide फेकला अन् नॉन स्ट्राईकवर असलेला रियान पराग रन घेण्यासाठी पळाला. अश्विन हाताने नको असा इशारा करत असतानाही रियान स्ट्रायकर एंडपर्यंत आला. तो पर्यंत वृद्धीमान साहाने चेंडू गोलंदाजाकडे फेकला व पराग रन आऊट झाला. यावेळी पराग प्रचंड नाराज दिसला आणि त्याने अश्विनकडे पाहून ती व्यक्तही केली. 

पाहा व्हिडीओ... 

 

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरराजस्थान रॉयल्सआर अश्विनगुजरात टायटन्स
Open in App