Join us  

David Miller IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ८ चेंडूंत ४२ धावा; गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरच्या masterclass खेळीचा पाहा Highlights Video

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : डेव्हिड मिलर ( David Miller) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने फायनलमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:13 AM

Open in App

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : डेव्हिड मिलर ( David Miller) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने फायनलमध्ये प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग GT ने सहज केला. पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर   शुबमन गिल ( Shubman Gill ) व मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) यांनी RRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी ४३ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक व मिलर यांनी ६१ चेंडूंत नाबाद १०१ धावा चोपल्या. विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावा हव्या असताना मिलरने ३ चेंडूंत ( 6,6,6) सामना संपवला.  राजस्थानकडून संजू सॅमसन व जोस बटलर यांनी ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. संजूने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूंत २८ धावांची खेळी केली. सुरूवातीला बटलरने ३८ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील १८ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. बटलर ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर  रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.  लक्ष्याचा पाठलाग वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाला.   त्यानंतर शुबमन गिल व मॅथ्यू वेड यांनी ७१ धावांची भागीदारी केली. गिल २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर रन आऊट झाला.  वेडही ( ३५)  १०व्या षटकात ओबेड मॅकॉयच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

 घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral  

हार्दिक पांड्या व डेव्हिड मिलर यांनी GT चा डाव  सावरला. मिलर ३८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर, तर पांड्या २७ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला. गुजरातने ३ बाद १९१ धावा करून ७ विकेट्स राखून बाजी मारली. 

जोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video 

गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात तिसऱ्यांदा १८०+ धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब ( २०१४), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( २०१७), चेन्नई सुपर किंग्स ( २०१८), कोलकाता नाईट रायडर्स ( २०१९) व राजस्थान रॉयल्स ( २०२०) यांनी अशी कामगिरी केली होती. प्ले ऑफमध्ये अखेरच्या षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा मान गुजरातने पटकावला. त्यांनी १६ धावा हव्या असताना तीन षटकार खेचले. याआधी चेन्नई सुपर किंग्सने मागील पर्वात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरच्या षटकात विजयासाठी हव्या असलेल्या १३ धावा केल्या होत्या.  

पाहा व्हिडीओ... 

 

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स
Open in App