Join us  

IPL 2022 Prize Money: पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; जाणून घ्या पूर्ण लिस्ट  

IPL 2022 Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना रविवार २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 6:30 PM

Open in App

IPL 2022 Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना रविवार २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२२मध्ये प्रथमच खेळणाऱ्या गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) घरच्या मैदानाचा फायदा उचलण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्यांच्यासमोर २००८च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचे ( Rajasthan Royals) आव्हान आहे. गुजरात व लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ दाखल झाल्याने बीसीसीआयच्या महसुलातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच आयपीएल २०२३मध्ये बक्षीस रक्कमेत २०-२५ टक्के वाढ करणार असल्याचा विचार BCCI करत आहे. मात्र, यावेळच्या विजयी संघाला किती रक्कम मिळणार हे माहित्येय का? InsideSport ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बक्षीस रक्कमेत वाढ, हा विषय चर्चेत आहे. पुढील आयपीएलमध्ये २० ते २५ टक्के वाढ करण्याचा विचार सुरू आहे, परंतु अद्याप नेमकी किती रक्कम हे ठरलेले नाही.  आयपीएल २०२३ला सुरूवात होण्यापूर्वी त्याची घोषणा केली जाईल.'' २०१६मध्ये आयपीएलच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्यात आली होती.  

आयपीएल २०२२ ची बक्षीस रक्कम ( IPL 2022 Prize Money)

  • विजेता संघ - २० कोटी
  • उपविजेता -  १३ कोटी
  • तिसरा क्रमांक - ७ कोटी
  • चौथा क्रमांक - ६.५ कोटी 

 २०१६नंतर २०१७मध्ये बक्षीस रक्कम कमी करून १५ कोटी करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये ती पुन्हा २० कोटी करण्यात आली. २०२०मध्ये कोरोनामुळे ही रक्कम १० कोटी करण्यात आली होती. पण, यावेळेस बीसीसीआयने स्पॉन्सरशीपमधून विक्रमी १००० कोटी कमावले.     

पर्वविजेताउपविजेतातिसरा क्रमांकचौथा क्रमांक
२०२२२० कोटी१३ कोटी७ कोटी६.५ कोटी
२०२१२० कोटी१२.५ कोटी८.७५ कोटी८.७५ कोटी
२०२०१० कोटी६.२५ कोटी४.३७५ कोटी४.३७५ कोटी
२०१९२० कोटी१२.५ कोटी८.७५ कोटी८.७५ कोटी
२०१८२० कोटी१२.५ कोटी८.७५ कोटी८.७५ कोटी
२०१७ १५ कोटी१० कोटी५ कोटी५ कोटी

 

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयगुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्स
Open in App