IPL 2022 Bids : बीसीसीआयनं दोन नव्या टीमसाठी टेंडर काढलं; बोली लावण्यासाठी फाडावी लागेल १० लाखांची पावती!

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत.  सुरूवातीला नव्या संघाची मुळ किंमत ही १७०० कोटी असावी असा विचार सुरू होता, परंतु आता ती २००० कोटी ठेवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:37 PM2021-08-31T15:37:16+5:302021-08-31T15:37:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 New Teams: BCCI confirms tender for 2 IPL teams can be purchased till October 5th, 2021 | IPL 2022 Bids : बीसीसीआयनं दोन नव्या टीमसाठी टेंडर काढलं; बोली लावण्यासाठी फाडावी लागेल १० लाखांची पावती!

IPL 2022 Bids : बीसीसीआयनं दोन नव्या टीमसाठी टेंडर काढलं; बोली लावण्यासाठी फाडावी लागेल १० लाखांची पावती!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 New Teams: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) नं इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी ( IPL 2022) दोन नव्या संघांसाठी टेंडर मागवले आहे. अदानी ग्रूप, RPG संजीव गोएंका ग्रूप, टोरेंट फार्मा कंपनी यांची नावं चर्चेत आहेत आणि या टेंडरसाठी ५ सप्टेंपूर्वी अर्ज करावा लागणार आहे. ( BCCI sets October 5 deadline for submitting tender) या मुदतीपूर्वी इच्छुकांना सर्व कागदपत्रं जमा करावी लागतील, असे बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. २०११नंतर प्रथमच आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत. ( It will be the first time since 2011 that ten teams will participate in the T20 league)

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत.  सुरूवातीला नव्या संघाची मुळ किंमत ही १७०० कोटी असावी असा विचार सुरू होता, परंतु आता ती २००० कोटी ठेवण्यात आली आहे. पण, बीसीसीआयला एक संघ ३ ते ३५०० कोटींना विकला जाईल, अशी अपेक्षा आहे. या लिलावाची कागदपत्रांसाठी बोली लावणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपये भरावे लागतील आणि ते परत केले जाणार नाहीत. ( For the time being, the interested parties will have to purchase bid documents at a non-refundable fee of Rs 10 lakh.)


ज्या कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर ३००० कोटी इतके आहे त्यांनाच बोली लावता येणार आहे. एका संघ खरेदी करताना तीनपेक्षा अधिक कंपनींना एकत्र येता येणार नाही  अहमदाबाद, लखनौ व पुणे या तीन नव्या शहरांची चर्चा आहे. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, लखनौ येथे एकाना स्टेडियम आहे आणि त्यांची प्रेक्षकक्षमता अधिक आहे. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार इच्छुकांना ittipl2021@bcci.tv या मेलवर मेल करून बोली लावता येणार आहे आणि त्यानंतरची पुढील प्रक्रिया सुरू होईल. 

Web Title: IPL 2022 New Teams: BCCI confirms tender for 2 IPL teams can be purchased till October 5th, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.