Join us  

IPL 2022 in Mumbai : जवळपास ठरलंय... आयपीएलचे १५ वे पर्व मुंबईतच होणार, तीन स्टेडियम्सवर सामने खेळवणार!

IPL 2022 in Mumbai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे सर्व सामने मुंबईत खेळवले जातील हे जवळपास निश्चित झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 4:49 PM

Open in App

IPL 2022 in Mumbai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे सर्व सामने मुंबईत खेळवले जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली आणि मुंबईतच संपूर्ण स्पर्धा खेळवण्यावर सर्वांचं एकमत झालं. २० फेब्रुवारीला याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.  

The Telegraphiने दिलेल्या माहितीनुसार मुंबई व शेजारील तीन स्टेडियम्सवर आयपीएल २०२२चे सामने खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२२ला मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. २७ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता आयपीएलचे सामने एकाच शहरात किंवा राज्यात खेळवण्याचा विचार आहे आणि त्यासाठी बीसीसीआयनं मुंबईची निवड केली आहे. 

कोणत्या स्टेडियवर होतील सामने ?

  • वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी व्हाय पाटील स्टेडियम यांची आयपीएल २०२२च्या सामन्यांसाठी निवड केली गेली आहे.
  • गरज पडल्यात पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरही काही सामने खेळवले जाऊ शकतील.
  • या सर्व स्टेडियम्सच्या आसपास चांगले फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत आणि त्यामुळे खेळाडूंच्याही ते सोईचे ठरू शकते. 

 

जय शाह काय म्हणाले होते? 

कोरोनामुळे गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धा युएई आणि दुबईत पार पडल्या आहेत. त्यामुळे, संयोजकांना मोठा आर्थिक भारही सहन करावा लागला आहे. त्यामुळेच यंदाच्या आयपीएल स्पर्धा देशात व्हाव्यात, यासाठी सर्वच संघांचे मालक आग्रही आहेत. जय शहा यांनी यंदाच्या आयपीएल सिझनची घोषणाच केली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदाच्या 15 व्या आयपीएल हंगामाला सुरुवात होईल. तर, मे महिनाअखेरीस हा सिझन संपेल, असे शहा यांनी सांगितले. स्पर्धेतील बहुतांश संघांच्या मालकांनी यंदाचा सिझन भारतातच खेळविण्यात यावा, अशी मागणी केल्याचेही शहा म्हणाले. 

अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले

असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)

  • २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. 
  • दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
  • गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
  • साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल. 

 प्ले ऑफचे चार सामने  

  • क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
  • अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २  
टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई
Open in App