Join us  

IPL 2022 Mega Auction : चेन्नई ते लखनौ, दहा संघांचे स्टार खेळाडू ठरले; जाणून घ्या मेगा ऑक्शनसाठी कोणी किती कोटी वाचवले!

IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ या नव्यानं दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींचे प्रत्येकी ३ खेळाडू जवळपास निश्चित झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 4:24 PM

Open in App

IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ या नव्यानं दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींचे प्रत्येकी ३ खेळाडू जवळपास निश्चित झाले आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीच्या ताफ्यात हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि राशिद खान दिसतील, तर लखनौच्या संघात लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिश्नोई असतील. या दोन्ही फ्रँचायझींनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी यात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. अहमदाबाद व लखनौ यांनी बीसीसीआयनं मेगा ऑक्शनसाठी दिलेल्या ९० कोटींच्या बजेटमधून प्रत्येकी ३ खेळाडूंना करारबद्ध करताना अनुक्रमे ५३ व ६० कोटी वाचवले आहेत. पण, आयपीएल मेगा ऑक्शनसाठी सर्वाधिक रक्कम कोणाच्या बटव्यात आहे, हे माहित्येय?  

कोणाच्या ताफ्यात कोणते खेळाडू अन् खात्यात किती शिल्लक 

  1. पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
  2. सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
  3.  राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
  4. लखनौ - लोकेश राहुल ( १५ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ११ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६० कोटी
  5. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
  6. अहमदाबाद - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५३ कोटी
  7. चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  8. मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  9. कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  10. दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी
टॅग्स :आयपीएल २०२१अहमदाबादलखनऊबीसीसीआय
Open in App