IPL 2022 Mega Auction : १० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ फ्रँचायझीनं त्यांच्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावं जाहीर  केली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलीय ती आयपीएल मेगा ऑक्शनची...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:09 PM2022-01-22T12:09:56+5:302022-01-22T12:10:20+5:30

IPL 2022 Mega Auction : List of all teams retained players, draft picks and purse remaining ahead of mega auction | IPL 2022 Mega Auction : १० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

IPL 2022 Mega Auction : १० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

Next

IPL 2022 Mega Auction : अहमदाबाद आणि लखनौ फ्रँचायझीनं त्यांच्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावं जाहीर  केली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलीय ती आयपीएल मेगा ऑक्शनची... अहमदाबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुबमन गिल यांना ताफ्यात दाखल करून घेतले. अहमदाबादनं संघाचे नेतृत्व हार्दिकच्या खांद्यावर सोपवले आहे. हार्दिक व राशिद यांच्यासाठी अहमदाबादनं प्रत्येकी १५ कोटी मोजले आहेत, शुबमन गिलला ८ कोटी दिले आहेत. लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुल, मार्नक स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना ताफ्यात दाखल करून घेतले. लखनौनं लोकेश राहुलसाठी १७ कोटी मोजले आहेत.  स्टॉयनिसला ९.२ कोटी, तर बिश्नोईला ४ कोटी दिले आहेत.   

कोणाच्या ताफ्यात कोणते खेळाडू अन् खात्यात किती शिल्लक 

  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
  • राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
  • लखनौ - लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ५८ कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
  • अहमदाबाद - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ५२ कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी

Web Title: IPL 2022 Mega Auction : List of all teams retained players, draft picks and purse remaining ahead of mega auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app