Join us

IPL 2022 Mega Auction Double Good News: 'गुड न्यूज'चा डबल धमाका! टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सकाळी झाला बाबा, दुपारी लागली ४ कोटींची बोली

क्रिकेटपटूने फोटो शेअर करत दिली गोड बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 16:55 IST

Open in App

IPL 2022 Mega Auction Double Good News: टीम इंडियाच्या स्टार ऑलराऊंडर खेळाडूच्या घरी रविवारी 'दुहेरी आनंद' साजरा करण्यात आला. IPL 2022 Mega Auction मध्ये भारतीय ऑलराऊंडरला धोनीच्या CSK ने ४ कोटींच्या बोलीवर संघात दाखल करून घेतले आणि त्यातच त्याच्या घरी रविवारच्या दिवशी छोट्या पाहुण्याचंही आगमन झालं. भारतीय ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube blessed with baby Boy) रविवारी बाबा झाला. त्यानेच ही गोड बातमी साऱ्यांना सांगितली.

रविवारी १३ फेब्रुवारीला सकाळी शिवम दुबेच्या घरी एका छोट्या पाहुण्याचा जन्म झाला. शिवम आणि त्याची पत्नी अंजुम हे एका मुलाचे आई-वडील झाले. त्यातच IPL ऑक्शनने हा आनंद द्विगुणीत केला. रविवारच्या दिवशी जेव्हा दुसऱ्या दिवशीच्या लिलावाला सुरूवात झाली, त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाने शिवम दुबेला ४ कोटी रुपयांना विकत घेतलं. चेन्नई सुपर किंग्जने शिवम दुबेवर अष्टपैलू म्हणून ४ कोटी रुपयांचा डाव खेळला. याआधी शिवम दुबे राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.

अष्टपैलू शिवम दुबेने गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत लग्न केलं. दोघांनी एका खाजगी समारंभात लग्न केलं. आंतरधर्मीय विवाह असल्याने या विवाहाबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण शिवमने त्यावर काहीही लक्ष दिलं नाही. शिवम दुबेने भारतीय संघाकडून वनडे आणि टी२० मध्ये पदार्पण केले. शिवम दुबेने टीम इंडियासाठी 1 वनडे आणि १३ टी२० सामने खेळले आहेत.

Open in App