Join us  

IPL 2022: टीम इंडियात फ्लॉप ठरलेला खेळाडू चेन्नईकडून खेळणार; धोनीच्या हट्टापुढे CSK झुकणार?

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर सीएसकेची नजर; ऑक्शनमध्ये बोली लावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 3:47 PM

Open in App

मुंबई: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनंआयपीएल २०२१ चं जेतेपद पटकावलं. आतापर्यंत नऊवेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईनं चारवेळा विजेतेपद पटकावलं आहे. मात्र आता चेन्नईसह सगळ्याच संघांचा चेहरामोहरा बदलणार आहे. २०२२ च्या आयपीएलमधील मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये सीएसके काही नव्या आणि तगड्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश आहे. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वत: या खेळाडूसाठी आग्रही आहे.

पुढील वर्षी होत असलेल्या मेगा ऑक्शनच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. हार्दिक पांड्या सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्स त्याला रिटेन करणार नाही. पांड्याला सीएसकेमध्ये घेण्यासाठी धोनी उत्सुक आहे. पांड्या ड्वेन ब्राव्होची जागा घेईल. विशेष म्हणजे पांड्यानं धोनीच्याच नेतृत्त्वाखाली पदार्पण केलं होतं. 

हार्दिक पांड्या महेंद्रसिंह धोनीचा अतिशय आदर करतो. हार्दिकनं टीम इंडियाकडून खेळण्यास सुरुवात केली, त्यावेळी धोनीकडेच संघाची धुरा होती. गेल्या आयपीएलमध्ये पांड्याला छाप पाडता आली नाही. त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. मात्र तरीही त्याला टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी देण्यात आली. मेंटॉर असलेला धोनी पांड्यासाठी आग्रही असल्यानं पांड्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं.

मुंबई इंडियन्स पांड्याला रिटेन करण्याची शक्यता धूसर आहे. रिटेशन्सच्या बाबतीत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची नावं पुढे आहेत. हार्दिक आयपीएलमध्ये ९२ सामने खेळला आहे. त्यात २७.३३ च्या सरासरी आणि १५३.९१ च्या स्ट्राईक रेटनं त्यानं १ हजार ४६७ धावा फटकावल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत ३१.२६ च्या सरासरीनं त्यानं ४२ फलंदाज बाद केले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्या
Open in App