Join us  

Quinton de Kock IPL 2022 LSG vs KKR Live Update : पठ्ठ्याने २० चेंडूंत चोपल्या १०० धावा; क्विंटन डी कॉकच्या ऐतिहासिक खेळीचा हा Video पाहा! 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    आयपीएलमध्ये यष्टिरक्षकाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी... आयपीएल इतिहासातील  तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी... २० षटकांत एकही विकेट न गमावण्याचा पराक्रम...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:02 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    आयपीएलमध्ये यष्टिरक्षकाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी... आयपीएल इतिहासातील  तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी... २० षटकांत एकही विकेट न गमावण्याचा पराक्रम... असे अनेक विक्रम आज नोंदवले गेले. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व लोकेश राहुल या लखनौ सुपर जायंट्सच्या ( LSG ) सलामीवीरांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांवर आज दया माया दाखवलीच नाही. १२ धावांवर असताना क्विंटनला जीवदान देणे KKRला खूपच महागात पडले. त्याने अवघ्या ५९ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केलेच, शिवाय लोकेशसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी २१० धावांची भागीदारी केली. 

क्विंटन डी कॉक- लोकेश राहुल नाबाद २१०; आयपीएलमध्ये इतिहास घडला; LSGच्या ओपनर्सनी मोडले विक्रमलोकेश राहुल  ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या दोघांमुळे LSG ने एकही विकेट न गमावता २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. LSG ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याचा फटका त्यांना बसला.  क्विंटन व लोकेश यांनी संपूर्ण २० षटके खेळून विक्रमांची नोंद केली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर,  तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. लखनौने २१० धावा केल्या.  ( पाहा IPL 2022 - LSG vs KKR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

पाहा क्विंटनची फटकेबाजी... 

टॅग्स :आयपीएल २०२२क्विन्टन डि कॉकलोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App