Join us  

Quinton de Kock IPL 2022 LSG vs KKR Live Update :  ६ चौकार, ७ षटकार!; क्विंटन डी कॉक १२ धावांवर जीवदान देणे पडले महागात, झळकावले शतक 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    लोकेश राहुल  ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने आज कमाल करताना KKRच्या गोलंदाजांना चोपून काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 9:02 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    लोकेश राहुल  ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) या जोडीने आज कमाल करताना KKRच्या गोलंदाजांना चोपून काढली. LSGच्या सलामीवीरांनी पहिला पॉवर प्ले सावधपणे खेळून काढल्यानंतर फटकेबाजीला सुरूवात केली.  KKRविरुद्ध आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदारीची नोंद आज या दोघांनी केली. क्विंटनला १२ धावांवर जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर तो जो सुटला तो सुटला. त्याने आयपीएलमधील आज दुसरे शतक झळकावताना KKRची वाट लावली. 

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याच षटकाचा शेवट क्विंटनने खणखणीत षटकार मारून केला. पण, KKRच्या गोलंदाजांनी लखनौच्या धावगतीवर लगाम लावला होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांना ४५ धावा करता आल्या. ४३ चेंडूंत त्यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सेट झाल्यानंतर क्विंटन व लोकेश यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. 

१०व्या षटकात टीम साऊदीला षटकार खेचून लोकेशने यंदाच्या पर्वातही ५०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये सलग पाचव्या पर्वात त्याने हा पराक्रम केला. क्विंटननं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम क्विंटनने नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा ( ४८ ) विक्रम मोडला. त्यापाठोपाठ लोकेशनेही ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या ९९ डावांत लोकेशने ३० अर्धशतकं व ४ शतकं झळकावली आहेत. या दोघांनी शतकी भागीदारी केली खरी, परंतु आयपीएल २०२२मधील पहिल्या विकेटसाठीची ही संथ शतकी भागीदारी ठरली. मात्र, KKRविरुद्धची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.  ( पाहा IPL 2022 - LSG vs KKR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

क्विंटनने ५९ चेंडूंत आयपीएलमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्यात ६ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. '

टॅग्स :आयपीएल २०२२क्विन्टन डि कॉकलखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App