Join us  

Rinku Singh Out on No Ball? IPL 2022 : मार्कस स्टॉयनिसचा पाय पुढे पडला, रिंकू सिंग No Ball वर आऊट झाला?; फॅन्समध्ये रंगलीय चर्चा, Video 

Rinku Singh Out on No Ball? IPL 2022 KKR vs LSG : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत लखनौने २ धावांनी विजय मिळवला. लखनौच्या २१० धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने २०८ धावांपर्यंत मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 4:18 PM

Open in App

Rinku Singh Out on No Ball? IPL 2022 KKR vs LSG : लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला कालचा सामना हा इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील सर्वात थरारक सामना झाला. रिंकू सिंगने  ( Rinku Singh) अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करून विजयाचा घास KKRच्या तोंडापर्यंत नेला होता, परंतु एव्हिन लुईसच्या अफलातून कॅचने त्याची चव त्यांना चाखता आली नाही. Marcus Stoinis ने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर एव्हिन लुईसने ( Evin Lewis) अफलातून झेल घेतला. पण, स्टॉयनिसने टाकलेला तो चेंडू No Ball असल्याचा दावा चाहते करत आहेत. 

लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक या जोडीने २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर,  तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात KKRची सुरुवात निराशाजनक  झाली. वेंकटेश अय्यर ( ०)  व अभिजित तोमर ( ४) यांची विकेट मोहसिन खानने घेतली. २ बाद ९ अशा अवस्थेत असणाऱ्या KKRला नितिश राणा ( ४२) व कर्णधार श्रेयस अय्यर ( ५०) यांनी सावरले. अय्यर व राणाने २७ चेंडूंत ५६ धावा चोपल्या. त्यानंतर अय्यर व सॅम बिलिंग्स ( ३६) यांनी ४० चेंडूंत ६६ धावा चोपल्या. आंद्रे रसेल ( ५) लगेच माघारी परतला.

सुनील नरीन व रिंकू सिंग यांची तुफान फटकेबाजी KKR ला आशेचा किरण दाखवणारी ठरली. या दोघांनी १९ चेंडूंत ५८ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात २१ धावा असताना रिंकूने ४, ६ ,६, २ अशी सुरूवात केली. २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एका हाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. रिंकू १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ४० धावांवर बाद झाला. स्टॉयनिसने अखेरच्या चेंडूवर उमेश यादवची विकेट घेत लखनौला २ धावांनी सामना जिंकून दिला. कोलकाताने ८ बाद २०८ धावा केल्या.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App