Gujarat Titans IPL 2022, LSG vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने ८२ धावांत लखनौ सुपर जायंट्सला गुंडाळले, Play Offsमधील स्थान पक्के केले

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:51 PM2022-05-10T22:51:42+5:302022-05-10T22:56:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, LSG vs GT Live Updates : Gujarat Titans become the first team to qualify for the play-offs of IPL 2022, beat Lucknow Supergiants by 62 runs | Gujarat Titans IPL 2022, LSG vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने ८२ धावांत लखनौ सुपर जायंट्सला गुंडाळले, Play Offsमधील स्थान पक्के केले

Gujarat Titans IPL 2022, LSG vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने ८२ धावांत लखनौ सुपर जायंट्सला गुंडाळले, Play Offsमधील स्थान पक्के केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. राशिद खानने ( Rashid Khan) चार व पदार्पणवीर साई किशोरने दोन विकेट्स घेत गुजरातला ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातने IPL 2022च्या प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्याचा पहिला मान पटकावला. 

गुजरातचे फलंदाज ज्या खेळपट्टीवर चाचपडले तेथे लखनौच्या फलंदाजांचा कस लागणार हे निश्चित होते. क्विंटन डी कॉकला ( १) यश दयालने माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद शमीने लखनौला मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार लोकेश राहुलची ( ८) विकेट घेतली. आज पदार्पण करणाऱ्या करन शर्माला ( ४) यशने बाद केले. दीपक हुडा व कृणाल पांड्या या जोडीवर लखनौला फार विश्वास होता. पण, राशिद खानच्या अप्रतिम फिरकीने कृणालला  चकवले. यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने तितक्याच चपळाईने स्टम्पिंग केली. पदार्पणवीर साई किशोरने लखनौला पाचवा धक्का दिला. आयुष बदोनी ८ धावांवर यष्टीचीत झाला. लखनौचा निम्मा संघ ६१ धावांत तंबूत परतला.

मार्कस स्टॉयनिसच्या येण्याने लखनौवरील दडपण कमी होईल असे वाटत असताना दीपकसोबतचा त्याचा ताळमेळ चुकला. दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात मार्कस रन आऊट झाला. दीपकने एक धाव पूर्ण केली, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी धावताना त्याचा पाय  घसरला, परंतु तो पर्यंत मार्कस बराच पुढे आलेला आणि तो परत जाणार तोपर्यंत चेंडू साहाकडे आला. ही विकेट पाहून डग आऊटमध्ये बसलेल्या लोकेश राहुलनेही डोक्यावर हात मारला. त्यानंतर जेसन होल्डरला राशिदने LBW केले. लखनौचा अखेरचा आशास्थान दीपकलाही ( २७) माघारी पाठवून राशिदने गुजरातचा विजय पक्का केला. लखनौचा संपूर्ण संघ १३.५ षटकांत ८२ धावांतं तंबूत परतला. 


शुबमन गिल ( Shubman Gill ) व डेव्हिड मिलर ( David Miller ) या जोडीने गुजरात टायटन्सची घसरलेली गाडी रुळावर आणली. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना गुजरातचे तीन फलंदाज ५१ धावांवर माघारी पाठवले होते. हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) खराब फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. वृद्धीमान सहा ( ५), मॅथ्यू वेड ( १०) व हार्दिक पांड्या ( ११) हे माघारी परतले.  गिल व डेव्हिड मिलर या दोघांनी ४१ चेंडूंत ५२ धावांच भागीदारी केली. मिलर २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिल व राहुल तेवातिया यांनी २४ चेंडूंत ४१ धावा कुटल्या. गिल ४९ चेंडूंत ७ चौकारांसह ६३ धावांवर नाबाद राहिला. राहुल तेवातियाने १५ चेंडूंत २२ धावा चोपल्या. गुजरातने ४ बाद १४४ धावा केल्या. आवेशने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहसिनने १८ धावांत १, जेसन होल्डरने ४१ धावांत १  विकेट घेतली. कृणाल पांड्याने ४ षटकांत २४ धावा दिल्या.  ( पाहा IPL 2022 - LSG vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

Web Title: IPL 2022, LSG vs GT Live Updates : Gujarat Titans become the first team to qualify for the play-offs of IPL 2022, beat Lucknow Supergiants by 62 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.