Join us  

Aakash Chopra IPL 2022, LSG vs GT Live Updates : आकाश चोप्राची भविष्यवाणी खरी ठरली, दुसऱ्या चेंडूनंतर गुजरात टायटन्सची गाडी घसरली, Video

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) या नव्या संघांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांक पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 8:25 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) या नव्या संघांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांक पटकावले आहे.   या दोघांमधल्या आजच्या लढतीतून आयपीएल २०२२मधील प्ले ऑफमध्ये पात्र ठरणारा पहिला दावेदार मिळणार आहे. दोन्ही संघांच्या खात्यात ११ सामन्यांनंतर प्रत्येकी १६ गुण आहेत. पण, गुजरातला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्यात भारताचा माजी  क्रिकेटपटू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याने भविष्यवाणी केली आणि त्यानंतर गुजरातची गाडी घसरली. आकाश चोप्राचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्ससमोर तगडं लक्ष्य उभं करणार. साई किशोर याचे गुजरातकडून, तर करन शर्माचे लखनौकडून पदार्पण करणार आहे. गुजरातने आजच्या सामन्यात तीन बदल केले आहेत. ल्युकी फर्ग्युसन, साई सुदर्शन व प्रदीप सांगवान यांच्याजागी मॅथ्यू वेड, साई किशोर व यश दयाल यांची एन्ट्री झाली आहे. लखनौच्या संघात एक बदल असून रवी बिश्नोईच्या जागी करन शर्मा खेळतोय. शुबमन गिलला पहिल्या षटकाच्या अखेरच्या ( झेल सोडला) व दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ( रन आऊट) जीवदान मिळाले. वृद्धीमान सहालाही तिसऱ्या षटकात नशिबाने साथ दिली, परंतु पुढच्याच चेंडूवर मोहसिन खानने त्याला माघारी पाठवले. गुजरातला ८ धावांवर पहिला धक्का बसला. 

२.२ षटकं असताना आकाश चोप्राने समालोचन करताना याच षटकाच मॅथ्यू  वेडला फलंदाजीला यावं लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता आणि चौथ्या चेंडूवर सहा बाद झाला.  मॅथ्यू वेडने मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करताना दोन खणखणीत चौकार खेचले, पण आवेश खानच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो ( १०) यष्टिरक्षकाकडे झेल देऊन माघारी परतला. १३ धावावंर गिलला ( रन आऊट) पुन्हा जीवदान मिळाले. आयुष बदोनीने ही संधी गमावली. लखनौच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना गुजरातला पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ धक्के दिले अन् ३५ धावाच करू दिल्या. गुजरातची ही पॉवर प्लेमधील खराब कामगिरी ठरली. गिल व हार्दिक पांड्या डोईजड झाली होती, परंतु १०व्या षटकात आवेश खानने GT ला मोठा धक्का दिला. हार्दिक ११ धावांवर बाद झाला. ( पाहा IPL 2022 - LSG vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App