Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीच्या युवा खेळाडूने षटकार खेचून सामना फिनिश केला

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकात लखनौच्या डग आऊटमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केले होते. पण, अखेर लखनौने बाजी मारली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:35 PM2022-04-07T23:35:42+5:302022-04-07T23:37:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs DC Live Updates : Third consecutive win for Lucknow Super Giants,  defeated Delhi Capitals by 6 wickets, Ayush Badoni finsihed in style with a six | Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीच्या युवा खेळाडूने षटकार खेचून सामना फिनिश केला

Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीच्या युवा खेळाडूने षटकार खेचून सामना फिनिश केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) दमदार खेळ केला. लोकेश राहुलसह त्याने संघाचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर ८० धावांची खेळी करून लखनौला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन बसवले. पण, अखेरच्या षटकापर्यंत सामन्याची चुरस रंगली. शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकात लखनौच्या डग आऊटमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केले होते. पण, अखेर लखनौने बाजी मारली. 


पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) च्या धडाक्यानंतर कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant)  व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांनी दिल्ली कॅपिटल्सला ( DC) सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.  पृथ्वी ३४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला.  रिषभ व सर्फराज यांनी ५७ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली आणि संघाला ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. रिषभ ३९ व सर्फराज ३६ धावांवर नाबाद राहिले. प्रत्युत्तरात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी लखनौ सुपर जायंट्सना दमदार सुरूवात करून दिली. दुखापतीतून सावरून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या एनरिच नॉर्खियाने पाचवे षटक फेकले आणि क्विंटनने त्याचे जंगी स्वागत केले. सलग तीन चौकार व एक षटकार खेचून क्विंटनने त्या षटकात १९ धावा कुटल्या. ८व्या षटकात कुलदीप यादवचे स्वागत लोकेशने षटकाराने केले. पण, कुलदीपने पुढील षटकात राहुलची ( २४) राहुलची विकेट घेतली.     

क्विंटन दुसऱ्या बाजूने खिंड लढवत होता आणि त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ललित यादवने लखनौच्या एव्हिन लुईसची विकेट घेत दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या. पण, क्विंटन दमदार खेळत होता. नॉर्खियाने टाकलेल्या बाऊन्सरवर त्याने मारलेला षटकात हा लाजवाब होता. पण, त्याने बॅट मध्ये आणली नसती तर क्विंटनचा चेहरा फुटला असता. १६व्या षटकात नॉर्खियाने आणखी एक घातकी बाऊन्सर फेकला आणि अम्पायरने त्याला षटक थांबवण्यास सांगितले. कुलदीप यादव ते षटक पूर्ण करण्यासाठी आला आणि क्विंटनने त्याला दोन सलग चौकार खेचले. पण, अखेरच्या चेंडूवर क्विंटनला फिरकीच्या जाळ्यात अडकवून माघारी जाण्यास कुलदीपने भाग पाडले. क्विंटनने ५२ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८० धावा केल्या. 

लखनौला विजयासाठी २४ चेंडूंत २८ धावांची गरज असताना क्विंटन माघारी परतला आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी दडपण निर्माण करण्यास सुरूवात केल. दीपक हुडा व कृणाल पांड्या मैदानावर होते आणि लखनौला १२ चेंडूंत १९ धावा करायच्या होत्या. मुस्ताफिजूर रहमानने टाकलेल्या १९व्या षटकात कृणालने १४ धावा कुटल्या. पण, शार्दूलने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हुडाला ( ११) माघारी पाठवले. आयूष बदोनीने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचून लखनौवरील दडपण कमी केले. लखनौने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. बदोनीने विजयासाठी १ धाव हवी असताना षटकार खेचला. 

Web Title: IPL 2022 LSG vs DC Live Updates : Third consecutive win for Lucknow Super Giants,  defeated Delhi Capitals by 6 wickets, Ayush Badoni finsihed in style with a six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.