Join us  

Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : अरे बापरे!; क्विंटन डी कॉकचा चेहरा जवळपास फुटलाच होता; १४१kmph च्या वेगाने आलेल्या चेंडूने काळजाचा ठोका चुकवला, Video 

क्विंटनला रोखण्यासाठी दिल्लीच्या एनरिच नॉर्खियाने  वेगवान चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर क्विंटनचा चेहरा फुटलाच होता. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 11:06 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या क्विंटन डी कॉकने दमदार खेळ केला. लोकेश राहुलसह त्याने संघाचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर अर्धशतक झळकावून दिल्लीचे टेंशन वाढवले. क्विंटनला रोखण्यासाठी दिल्लीच्या एनरिच नॉर्खियाने  वेगवान चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर क्विंटनचा चेहरा फुटलाच होता. पण, क्विंटनने चपळता दाखवली अन् बॅट पुढे केली... मग पुढे काय घडले ते पाहा... 

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) च्या धडाक्यानंतर कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant)  व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांनी दिल्ली कॅपिटल्सला ( DC) सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पृथ्वी मैदानावर असेपर्यंत लखनौ सुपर जायंट्सचे ( LSG) गोलंदाज तव्यावर होते, परंतु त्याची विकेट पडली अन् दिल्लीची गळती सुरू झाली. मात्र, २०१६च्या १९वर्षांखालील भारतील संघातील दोन फलंदाज मैदानावर शड्डू ठोकून उभे राहिले आणि दिल्लीला कमबॅक करून दिले.  पृथ्वी ३४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला.  रिषभ व सर्फराज यांनी ५७ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली आणि संघाला ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. रिषभ ३९ व सर्फराज ३६ धावांवर नाबाद राहिले. 

लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी लखनौ सुपर जायंट्सना दमदार सुरूवात करून दिली. दुखापतीतून सावरून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या एनरिच नॉर्खियाने पाचवे षटक फेकले आणि क्विंटनने त्याचे जंगी स्वागत केले. सलग तीन चौकार व एक षटकार खेचून क्विंटनने त्या षटकात १९ धावा कुटल्या. ( 4, 4, 4, 0, 6, 1 - Quinton de Kock welcomes Anrich Nortje by smashing 19-run in an over ) या दोघांनी पहिल्या ६ षटकांत ४८ धावा केल्या. ८व्या षटकात कुलदीप यादवचे स्वागत लोकेशने षटकाराने केले. पण, कुलदीपने पुढील षटकात राहुलची ( २४) राहुलची विकेट घेतली.     

क्विंटन दुसऱ्या बाजूने खिंड लढवत होता आणि त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ललित यादवने लखनौच्या एव्हिन लुईसची विकेट घेत दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या. पण, क्विंटन दमदार खेळत होता. नॉर्खियाने टाकलेल्या बाऊन्सरवर त्याने मारलेला षटकात हा लाजवाब होता. 

टॅग्स :आयपीएल २०२२क्विन्टन डि कॉकदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App