Join us  

Andre Russell IPL 2022 KKR vs SRH Live Updates : उम्रान मलिकने धक्के दिले, परंतु आंद्रे रसेलने विक्रमी कामगिरीसह KKRला सावरले; SRHसमोर तगडे आव्हान ठेवले 

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबादने उम्रान मलिकच्या ( Umran Malik) दोन षटकांत सामना फिरवला व कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर फेकले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 9:26 PM

Open in App

IPL 2022 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबादने उम्रान मलिकच्या ( Umran Malik) दोन षटकांत सामना फिरवला व कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर दुर्दैवीरित्या आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे व नितिश राणा यांनी KKRचा डाव सारवला होता. पण, उम्रान मलिकने एकाच षटकात या दोघांना माघारी पाठवले आणि पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. उम्रानच्या वेगवान माऱ्यासमोर हतबल झालेल्या KKRचा डाव आंद्रे रसेल ( Andre Russell ) व सॅम बिलिंग्सने ( Sam Billings) सावरला.  ( पाहा IPL 2022 - KKR vs SRH  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्को येनसेनने त्याच्या पहिल्याच षटकात KKR ला धक्का दिला. वेंकटेश अय्यरची ( ७) बॅटला चेंडू लागून यष्टींवर आदळला अन् KKR ला फलकावर १७ धावा असताना पहिला धक्का बसला. नितिश राणा आज फॉर्मात दिसला आणि त्याने सुरेख फटकेबाजी करून धावांचा वेग वाढवला. अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता, परंतु त्यानेही अधूनमधून मोठे फटके खेळले. KKR ने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या. नितिश राणा आणि अजिंक्य यांची ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी उम्रान मलिकने संपुष्टात आणली. नितिश १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते, परंतु प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, मलिकच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शशांक सिंगने सीमारेषेवर अफलातून झेल घेतना अजिंक्यला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यने ३ खणखणीत षटकार खेचले. उम्रान मलिकच्या या षटकाने KKR ला बॅकफूटवर फेकले. 

पुढच्या षटकात श्रेयस अय्यरलाही ( १५)  त्याने बाद केले. टी नटराजनच्या गोलंदाजीवर  रिंकू सिंग ( ५) पायचीत झाला आणि KKR चा निम्मा संघ ९४ धावांवर माघारी परतला. सॅम बिलिंग्स व आंद्रे रसेल यांनी KKR चा डाव पुन्हा रुळावर आणला होता आणि ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दरम्यान रसेलने आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंत २००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. याशिवाय ३००+ धावा आणि १०+ विकेट्स या आयपीएलच्या चार पर्वांत घेणारा तो एकमेव अष्टपैलू खेळाडू ठरला. जॅक कॅलिस ( ३), किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या व शेन वॉटस ( प्रत्येकी २) यांना रसेलने मागे टाकले. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात बिलिंग्सला ( ३४)  बाद केले.  रसेलसोबत त्याची भागीदारी ६४ धावांवर संपुष्टात आली. भुवीने ४ षटकांत २७ धावा देताना एक विकेट घेतली. टी नटराजननेही ( १-४३) व मार्को येनसेन ( १-३०) यांनी एक विकेट घेतली. उम्रानने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या २०व्या षटकात रसेलने तीन खणखणीत षटकार खेचून २० धावा जोडल्या. कोलकाताने ६ बाद १७७ धावा केल्या. रसेल २८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App