IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये म्हटलं की ग्लॅमर आलंच... देशातील तसेच जगभरातील स्टार्स क्रिकेटपटूंना एकत्र खेळताना पाहण्याचं हे चाहत्यांचं हक्काचं व्यासपीठ. त्यामुळे ही संधी सहसा कुणी सोडत नाही. त्यात कॅमेरामनही 'सुंदर' चेहरा टिपण्यासाठी सज्जच असतो. आयपीएल २०२२त आतापर्यंत अनेक मिस्ट्री गर्ल दिसल्या. त्यापैकी एकतर अभिनेत्री निघाली.. त्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यात मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली. ती बहुतेक हार्दिक पांड्याच्या संघाची फॉलोअर असावी आणि GTसाठी ती शिट्ट्या मारतानाही दिसली.
१५६ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले. नितीश राणा ( २) काहीच कमाल दाखवू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांनी KKR चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यश दयालने GT ला मोठे यश मिळवून देताना अय्यरला ( १२) बाद केले. त्यापाठोपाठ त्याने रिंकू सिंगचाही ( ३५) अडथळा दूर केला. १३व्या षटकात यश दयालने KKRच्या आंद्रे रसेलची विकेट मिळवलीच होती, परंतु दुर्दैवाने तो No Ball ठरला. रसेलला १० धावांवर जीवदान मिळाले.
दरम्यान मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली.