Join us  

No ball Controversy IPL 2022 : रिषभ पंतचा मैदानात राडा, तर हॉटेल रुममध्ये Ricky Ponting चा धिंगाणा; दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकांनीच सांगितला किस्सा 

No ball Controversy IPL 2022 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात नैराश्याचे वातावरण आहे. पराभवापेक्षा त्या सामन्यात अम्पायरने न दिलेल्या No Ball मुळे दिल्लीचा संघ प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 4:09 PM

Open in App

No ball Controversy IPL 2022 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात नैराश्याचे वातावरण आहे. पराभवापेक्षा त्या सामन्यात अम्पायरने न दिलेल्या No Ball मुळे दिल्लीचा संघ प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. पण, आता हे सर्व मागे सोडून Delhi Capitals नव्याने मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यात मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग ( Ricky Ponting  ) याची वापसी झाली आहे. कुटुंबातील सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पाँटिंग क्वारंटाईन झाला होता. त्यामुळे RR विरुद्धच्या सामन्यात तो डग आऊटमध्ये दिसला नव्हता. पण, त्या सामन्यातील अम्पायरच्या निर्णयावर पाँटिंगचा पाराही चढला होता आणि हॉटेल रुममध्ये धिंगाणा घालत्याची कबुली त्याने स्वतः दिली.

तो म्हणाला, ते खूप संतापजनक होतं. मी हॉटेल रुममधील तीन किंवा चार टीव्ही रिमोट तोडले आणि पाण्याच्या काही बॉटल्स दिवाळावर फेकल्या. प्रशिक्षक असतानाही तुम्हाला अशा प्रसंगी काहीच करता येत नाही, तेव्हा संताप अनावर होतोच. त्यात जेव्हा प्रत्यक्ष मैदानावर नसल्याने त्या संतापात अधिक भर पडते. 

दिल्ली कॅपिटल्सला ६ चेंडूंत ३६ धावांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूंवर खणखणीत षटकार खेचले. तिसरा चेंडू फुलटॉस होता आणि तो No Ball देण्याची मागणी दिल्लीच्या संघाने केली. पण, ती नाकारण्यात आली. दिल्लीला १५ धावांनी सामना गमवावा लागला. पाँटिंग म्हणाला,''अन्य संघांच्या तुलनेत आमची वाटचाल आव्हानात्मक सुरू आहे आणि यात दुमत नाहीच. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संघाने सकारात्मक दृष्टीकोन दाखवताना चांगला खेळ केला. आशा करतो की या कोरोनावर आम्ही मात करू.  अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला १०० टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. म्हणजेच त्याला १.१५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. पंतने कलम २.७मधील दुसऱ्या स्थराच्या नियमाचा भंग केला आणि त्याने त्याची चूक मान्य केली. शार्दूल ठाकूरला त्याच्या मॅच फीची ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक अमरे यांना १०० टक्के मॅच फी व एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली गेली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सरिषभ पंत
Open in App