Join us  

Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : अशोभनीय कृतीनंतरही रिषभ पंत चूक मान्य करायला तयार नाही, म्हणाला... 

No Ball Controversy राजस्थानच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली टक्कर दिली, परंतु अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोड रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:49 AM

Open in App

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या विजयाऐवजी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने घातलेल्या राड्याचीच चर्चा अधिक रंगली. राजस्थानच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली टक्कर दिली, परंतु अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोड रंगली. रिषभ पंतने फलंदाजांना माघारी बोलावले, सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आम्रे मैदानावर धावत जाऊन अम्पायरशी हुज्जत घालताना दिसले. या घडामोडीनंतरही अम्पायर त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि राजस्थानने १५ धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर रिषभने मोठे विधान केले. 

जोस बटलरच्या ११६ धावा, देवदत्त पडिक्कलच्या ५४ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ ( ३७) , डेव्हिड वॉर्नर ( २८), रिषभ पंत ( ४४) व ललित यादव ( ३७)  व रोव्हमन पॉवेल ( ३६) यांनी दमदार खेळ केला. दिल्लीला ८ बाद २०७ धावाच करता आल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर आर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या. 

रिषभ पंत काय म्हणाला?"मला वाटते की संपूर्ण सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु अखेरच्या क्षणाला पॉवेलने आम्हाला संधी निर्माण करून दिली. मला वाटले की तो नो बॉल आमच्यासाठी मौल्यवान असू शकला असता. पण, तो नो बॉल होता की नाही, हे तपासणे आमच्या हातात नव्हते. होय मी खूप निराश झालोय, परंतु काहीच करू शकत नाही. प्रत्येक जण संतापला होता. मला वाटले की तो नो बॉल होता. मैदानावर असलेल्या प्रत्येकाने तो पाहिला. तिसऱ्या अम्पायरने मध्यस्थी करताना तो नो बॉल जाहीर करायला हवा होता, परंतु मी नियम बदलू शकत नाही,'' असे रिषभ म्हणाला.

तो पुढे म्हणाला,''संघ व्यवस्थापन सदस्याला मैदानावर पाठवणेबरोबर नव्हते, पण आमच्या सोबत जे घडले ते सुद्धा योग्य नव्हते. ती क्षणाची प्रतिक्रिया होती, त्याबद्दल फार काही करता येत नाही. मला वाटते की यात दोन्ही बाजूंचा दोष होता.  संपूर्ण स्पर्धेत आम्ही काही चांगले अंपायरिंग पाहिले आहे. मला वाटले की आम्ही तिथून चांगली कामगिरी करू शकलो असतो. मग तुम्ही खूप जवळ जाता, विशेषत: अशा सामन्यासाठी जेव्हा इतर संघाने २२० धावा केल्या असतील, परंतु मला वाटते की आम्ही थोडी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. तो खेळाचा एक भाग आहे.''

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स
Open in App