Join us  

Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : कुलदीप यादवने KKRच्या अपमानाचा बदला घेतला, मुस्ताफिजूरनेही दिले हादरे; दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav) फिरकीसमोर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 9:23 PM

Open in App

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav) फिरकीसमोर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूने मागील सामन्यात KKRच्या ४ फलंदाजांना ३५ धावांत माघारी पाठवले होते आणि आज त्याने ३ षटकांत १४ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. यंदाच्या पर्वात कुलदीपने कोलकाताविरुद्ध ७ षटकांत ४९ धावांत ७ विकेट्स घेतल्या.  KKRकडून कर्णधार श्रेयस अय्यर व नितिश राणा यांनी दमदार कामगिरी करताना दिल्लीसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. मुस्ताफिजूर रहमानने अखेरच्या षटकात ३ धक्के दिले. 

दिल्लीकडून आज पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने ( Chetan Sakariya) पहिल्याच षटकात आरोन फिंचचा ( ३) त्रिफळा उडवला. अक्षर पटेलने  पाचव्या षटकात वेंकटेश अय्यरला ( ६) बाद केले. ८व्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने KKRला दोन धक्के दिले. पदार्पणवीर बाबा इंद्रजित ( ६) आणि सुनील नरीन ( Golden Duck) यांना त्याने बाद केले.  कर्णधार श्रेयर अय्यर व नितिश राणा यांनी ४८ धावांची भागीदारी करताना KKRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही डोईजड होणारी जोडी तोडण्यासाठी रिषभने पुन्हा कुलदीपच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याने पुन्हा कमाल केली. 

१४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने अय्यरला बाद केले. कुलदीपने टाकलेला चेंडू जरा खालीच राहिला आणि अय्यरच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाकडे गेला. रिषभनेही चपळाई दाखवताना खाली राहिलेला चेंडू सुरेख टिपला. अय्यर ३७ चेंडूंत ४२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेलची ( ०) स्टम्पिंग झाली.  नितिश राणा खेळपट्टीवर नांगर रोवून राहिला. त्याने अर्धशतक पूर्ण करताना रिंकू सिंगसोबत ३५ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात रिंकू २३ धावांवर बाद झाला. चौथ्या चेंडूवर नितिश राणा झेलबाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. मुस्ताफिजूर रहमानने पाचव्या चेंडूवर टीम साऊदीचा त्रिफळा उडवला. कोलकाताने ९ बाद १४६ धावा केल्या. 

आयपीएलच्या २०२० व २०२१ या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याने एकच विकेट घेतली होती. त्यानंतर KKRने त्याला रिलीज केले आणि आयपीएल २०२२त तोच कुलदीप यादव KKRविरुद्ध राग काढला... 

टॅग्स :आयपीएल २०२२कुलदीप यादवदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App