Join us  

IPL 2022, CSK vs RR Live Updates : राजस्थानच्या गोलंदाजांचे सॉलिड कमबॅक, पहिल्या ६ षटकांत दिल्या ७५ धावा अन् नंतर दिले दणके, Video 

ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 8:51 PM

Open in App

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पुढील आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) बूस्टर डोस मिळाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या कॅप्टन धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. पहिल्या सहा षटकांत १ बाद ७५ धावा चोपून CSK ने प्ले ऑफमधील यंदाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजाने दणके देताना दमदार कमबॅक केले... 

प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चौथ्या षटकात अलीने १८ धावा कुटल्या. त्यानंतर पुढील षटकात त्याने आर अश्विनला टार्गेट केले आणि १५ धावा चोपल्या. अली व कॉनवे यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अलीने सहाव्या षटकात बोल्टला धु धु धुतले. 6, 4, 4, 4, 4, 4 अशा २६ धावा चोपल्या. अलीने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल २०२२मधीले हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. चेन्नईने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. चेन्नईकडूनही ही दुसरी सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. सुरेश रैनाने २०१४मध्ये पंजाबविरुद्ध १६ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. अलीने आज महेंद्रसिंग धोनीचा २०१२ ( २० चेंडू वि. मुंबई ) विक्रम मोडला. 

आर अश्विनने अली व कॉवने यांची ३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कॉनवे १६ धावांवर LBW झाला. त्यानंतर ओबेड मॅकॉयने स्लोव्ह बॉल टाकून नारायण जगदीशनला ( १) बाद केले. रियान परागने ( Riyan Parag) हा झेल पकडून आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक १४ झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम नोंदवला. त्याने रवींद्र जडेजाचा २०२१सालचा १३, २०१५ सालचा १३ आणि रोहित शर्माचा २०१२चा १३ झेलचा विक्रम मोडला. युजवेंद्र चहलने ११व्या षटकात अंबाती रायुडूला ( ३) बाद करून CSKला चौथा धक्का दिला. चेन्नईने १० धावांत तीन फलंदाज गमावले. 

महेंद्रसिंग धोनी मैदानावर येताच स्टेडियमवर एकच जयघोष ऐकायला आला. चहलची आयपीएल २०२२मधील ही २५ वी विकेट ठरली आणि त्याने आयपीएलच्या एका पर्वात सर्वधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंमध्ये स्वतःचाच २०१५ सालचा २४ विकेट्सचा विक्रम मोडला. इम्रान ताहीरने २०१९मध्ये २६ विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले.  ६ षटकांत १ बाद ७५ धावा करणाऱ्या चेन्नईला त्यांनी पुढील ७ षटकांत ३३ धावांत ३ धक्के दिले. चेन्नईच्या १४ षटकांत ४ बाद १११ धावा झाल्या. ( पाहा IPL 2022 - CSK vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सआर अश्विनयुजवेंद्र चहल
Open in App